हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- आषाढी एकादशी निमित्त शहरातील भाविक भक्तांना हरिहरेश्वर श्री विठुरायाच्या रूपाचे दर्शन घडावे म्हणून दि 17 जुलै रोजी सकाळी 5 वाजता श्री परमेश्वर महाराज यांच्या मूर्तीची शहरातील सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा दासेवार व त्यांच्या सोबत असलेल्या महिलांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री परमेश्वर महाराज यांच्या मूर्तीची सुंदर अशी सजावट केली याच आषाढी एकादशीचे औचित्य साधून हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी श्री परमेश्वर मंदिर येथील विठुरायाचे मनोभावे दर्शन घेऊन माझ्या मतदारसंघातील नागरिकांना उत्तम आरोग्य व शेतकरी बांधवांना सुखात ठेव अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून दर्शन घेतले या प्रसंगी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी शहरातील जागरूक देवस्थान असलेल्या श्री परमेश्वर मंदिर परिसरात मोठ मोठ्या दर्शनासाठी रांगा लावून येथील विठू रायाचे दर्शन घेतल्याचे पाहण्यात आले…
याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय वातावरणात तल्लीन होऊन जातो याच आषाढी एकादशीचे औचित्य साधून हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान कडून दरवर्षी परमेश्वर मंदिर परिसरात भव्य धार्मिक कार्यक्रम घेऊन हा सोहळा साजरा केला जातो व त्यानंतर शहरातील मुख्य रस्त्याने भव्य अशी पालखी मिरवणूक काढून त्याची सांगता श्री परमेश्वर मंदिर देवस्थान येथे करण्यात येते याच आषाढी एकादशीच्या दिवशी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी पंढरपूर येथील विठुरायाचे दर्शन घेऊन आपल्या मतदारसंघातील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटी मध्ये असलेल्या हरिहरेश्वर रूपातील विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी त्यांनी उपस्थिती लावून भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या व माझ्या मतदार संघातील शेतकरी बांधवांना सुखी समाधानी व उत्तम आरोग्य मिळू दे अशी येथील पांडुरंगाच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली यावेळी शहरासह पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी आज सकाळ पासून श्री परमेश्वर मंदिर येथील विठुरायाचे व श्री परमेश्वर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली असल्याचे श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे संचालक संजय माने, विलास वानखेडे ,गजानन मुत्तलवाड यांनी सांगितले त्यानंतर हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले
यावेळी हिमायतनगर तालुकाकाँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन सूर्यवंशी, शहराध्यक्ष संजय माने, प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल भाई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्दन ताडेवाड, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक सुभाष शिंदे, युवक काँग्रेसचे शिवाजी माने, योगेश चिल्कावार, पापा पारडीकर सह तालुका काँग्रेस कमिटीचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते