उपोषणकर्ते दत्तात्रय अनंतवार यांच्या उपोषणाची शासनाने तात्काळ दखल घेण्याची मागणी ओबीसीच्या मागण्याकडे लोकप्रतिनिधीचे मात्र साफ दुर्लक्ष असल्याचा आरोप.
हिमायतनगर दि.३०: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून दिल्या जात आलेले जात प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे या मागणीसाठी हदगाव तालुक्यातील कवाणा येथे उपोषणास बसलेले दत्तात्रय अनंतवार यांची मागणी शासनाने तात्काळ मान्य करावी ह्या मागणी साठी हिमायतनगर तालुक्यांतील सकल ओ.बी.सी.समाज बांधवांनी आज दि 30 जुलै हिमायतनगर शहर कडकडीत बंद ठेऊन प्रशासनाचा जाहीर निषेध केला व अनंतवार यांच्या समर्थनार्थ आज तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांनी हिमायतनगर शहर कडकडीत बंद ठेऊन शहरातील मुख्य रस्त्याने रॅली काढत शहरातील नालंदा बुद्ध विहार येथील गौतम बुद्धाच्या प्रतिमेसमोर नमन करून संविधानाची होत असलेली पाय मल्ली शासनाने तात्काळ थांबून कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय घेऊ नये अशा सूचना केल्या
तालुक्यातील ओबीसी बांधवांच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी सर्व ओबीसी कार्यकर्ते दत्तात्रय अनंतवार यांनी दिनांक २१ जुलै पासून सुरू केलेले हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथील उपोषणास आज दहा दिवसांपासून अमर उपोषणास बसले आहेत. अजूनही शासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही त्यांची दिवसेंदिवस प्रकृती खालावत आहे. त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील समस्त ओबीसी बांधवानी अनंतवार यांच्या समर्थनार्थ हिमायतनगर शहर कडकडीत बंद ठेवून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळ पासूनच हिमायतनगर शहर कडकडीत बंद होते. कोणतेच दुकान किंवा हॉटेल चालू नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली ओबीसी समाजाच्या प्रश्नावर राज्य शासनाने त्वरित लक्ष केंद्रित नाही केल्यास ओबीसी समाज येणाऱ्या काळात याही पेक्षा तीव्र आंदोलन करेल असे ओ.बी.सी.तालुका अध्यक्ष बाबाराव जरगेवाड,दिलीप राठोड, सावता परिषदेचे शाम ढगे सह आदींनी सांगितले
यावेळी ओबीसी समाज जिल्हाध्यक्ष खरडे, व ओबीसी सामाजिक संघटनेचे नाना गुडेटवार, राजेश फुलारे, प्रा.कैलास राठोड, राम नरवाडे, सावता परिषदेचे युवा तालुका अध्यक्ष संतोष सातव,अनंता देवकत्ते , सदाशिव सातव, रवी जोनापल्ले,परमेश्वर उट्टलवार, मायबा होळकर, बळीराम देवकत्ते,बाळू आण्णा चवरे,प्रमोद राठोड,बबलू काळे,दिगंबर काळे, सुनील चव्हाण,दिनेश राठोड, दुर्गेश मंडोजवार, बबलू डांगे,शीतल सेवनकर,रवी जाधव,सुभाष बलपेलवार,प्रकाश रांमदिनवार, बंटी भाऊ गुड्डेटवार, विकास नरवाडे, परमेश्वर नागेवाड, सह हजारो ओबीसी बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी हिमायतनगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी शहरात चौक पोलीस बंदोबस्त लावून या आंदोलनात कुठलेही गालगोट लागू दिले नाही त्यामुळे हे आंदोलन शांततेत संपन्न झाले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड