मुंबई दि.३० :मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत राजपत्र जारी केले होते. राज्य सरकारने ओबीसी अंतर्गत जात प्रमाणपत्र जारी करण्याच्या प्रचलित पद्धतीत बदल करणारी मसुदा अधिसूचना (अध्यादेश नव्हे) जारी केली आहे. यानंतर राज्यातील जरांगे आणि ओबीसी नेत्यांमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यानंतर हा वाद अधिकच तापला आहे.
जरांगे यांच्या या वक्तव्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका करत जरांगेंना आव्हान दिले आहे. “मनोज जरांगे म्हणाले की जर तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध केलात तर आम्ही ओबीसी आरक्षणाला कोर्टात आव्हान देऊ आणि तुमचे आरक्षण घालवू. म्हणजे मनोज जरांगे यांना गरीब मराठा पोरांचं काहीही पडलेलं नाही. हजारो वर्षांपासून ज्यांचे मानवी हक्क नाकारले आहेत त्यांच्यासाठी समानतेची तरतूद संविधानात आहे. आरक्षणाच्या माध्यमातून या लोकांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे तेच जरांगेंना संपवायचे आहे.
“भाजपाला सोडा, आमच्याबरोबर या” प्रकाश आंबेडकरांची CM शिंदेंना थेट ऑफर
या आधुनिक युगात जरांगे हे ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहेत. एकीकडे त्यांना ओबीसींमधून आरक्षण हवे आहे आणि दुसरीकडे ते ओबीसींचे आरक्षण संपवण्याची भाषा बोलत आहेत. परस्परविरोधी विधाने करणाऱ्या जरांगे यांची काहीच औकात नाही. आता जरांगे यांनी न्यायालयात यावे, असे थेट आव्हान लक्ष्मण हाके यांनी दिले आहे.
मेळाव्यातून कार्यकर्त्यांना ‘टॉनिक’, निवडणुकीचंही ‘प्लॅनिंग’; घुले पाटलांच्या मनात नक्की काय?
मुख्यमंत्रीच हरवले आहेत! 24 तासांपासून हेमंत सोरेन नॉट रिचेबल, स्टाफचे फोनही बंद
डुप्लिकेटपणा करत घुसखोरी करून मनोज जरंगे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनात्मक पदावर असतानाही कायद्याचे व शपथेचे उल्लंघन केले. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथेचेही उल्लंघन करण्यात आले. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनाही याची अपेक्षा नव्हती. जरांगे यांना आता कोर्टात भेटलेच पाहिजे कारण आपण संविधानाची भाषा बोलत आहोत. आता ‘दूध का दूध और पानी का पानी’ होऊ द्या, असे हाके म्हणाले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड