लक्षवेधी प्रात्यक्षिके सादर
जाब्बर शेख मुदखेड दि.२६: आतंकवाद, उग्रवाद, नक्षलवाद, अलगाववाद अन्य देश विघातक बाबीचा खात्मा करण्यासाठी ४२१ प्रशिक्षण अधिनस्थ अधिकाऱ्यांनी दीक्षांत सोहळ्यात सामूहिक शपथ घेतली असून यावेळी जवानांनी सादर केलेले थरारक प्रात्यक्षिके सर्वांचे डोळे दिपवुन टाकणारे ठरले आहे.
मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रांगणात ता. २५ बुधवार रोजी ४२१ अधिनस्थ अधिकारी दीक्षांत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय पोलीस सेवा अप्पर महानिदेशक दीपक कुमार महानिरीक्षक सी टी व्यंकटेश, उपमहानिरीक्षक आर टी सी अमिरुल हसन अन्सारी लातूर,सी टी सी कामाडंट व्ही पी त्रिपाटी यांची प्रमुख उपस्थिती होती. अधिनस्थ अधिकाऱ्यांनी पथसंचलन करीत सलामी दिली. यावेळी शहीद जवानांच्या वीर पत्नींचा दीपककुमार यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी प्रशिक्षण देणाऱ्या मार्गदर्शकांना उल्लेखनीय कार्याबद्दल ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस महानिदेशक शहाजी उमाप आणि पोलीस अधिक्षक अविनाश कुमार,दीपक कुमार,अरुण कुमार, मोहम्मद शहानवाज, जाकी कुमार, हरीशंकर प्रसाद, वासुदेव,
निलेश कुमार, सी संजीवन, एस रमेश, उपस्थित होते.
देशातील विविध राज्यातून प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या ४२१ अधिनस्थ अधिकाऱ्यांना ४८ आठवड्यांच्या कालावधीत सखोल प्रशिक्षण देण्यात आले. या दलात थेट नियुक्त करण्यात आलेल्या अधिनस्थ अधिकारी कर्मचाऱ्यांची महत्वाची भूमिका म्हणजे दुर्गम भागातील नक्षलवाद, पूर्वोत्तर राज्यातील अलगाववाद, उग्रवाद, आतंकवाद यासोबतच संवेदनशील क्षेत्रातील संप्रदायिक उपद्रवांचा समूळ नायनाट करण्यासाठी या जवानांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार असल्याचे मत अप्पर महानिदेशक दीपककुमार यांनी व्यक्त केले आहे.
चौकट
दीक्षांत समारोहात साहसी खेळ आणि प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यात योग, मल्लखांब, रायफल चालवणे, अग्नी रिंग मधून जवानांच्या उड्या आणि मोटार सायकलचे साहसी प्रदर्शन यावेळी सादर करण्यात आले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड