नांदेड : सामाजिक राजकारणाचा वसा घेऊन समाजसेवेसाठी समर्पण भावनेतून काम करणारे भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांच्या सहयोग नर्सिंग कॉलेज चे कर्मचारी आणि विद्यार्थी हे लोहा तालुक्यातील कोष्टवाडी येथील महाप्रसादातून विषबाधा झालेल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सरसावले आहेत . सहयोग नर्सिंग चे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन रुग्ण सेवा दिली आहे. त्यामुळे डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांनी जो समाजसेवेचा वसा जपला आहे तो या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्यांनी जोपासला आहे .
लोहा तालुक्यातील कोष्टवाडी येथे नुकताच महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या महाप्रसादाच्या कार्यक्रमातून विषबाधा झाल्याने असंख्य नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. लोहा आणि नांदेड येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने येथे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कर्मचारी संख्या कमी पडली होती. नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय विष्णुपुरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेले दीडशे ते दोनशे रुग्ण हे उपचारा अभावी तळमळत असताना त्यांच्या उपचारासाठी आणि शासकीय रुग्णालयावर अचानक पडलेला ताण कमी करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांनी आपल्या सहयोग नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य यांच्याशी संपर्क साधून कॉलेजचे कर्मचारी आणि नर्सिंगाचा अभ्यास करणारे विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात पाठवून रुग्णांच्या उपचारासाठी त्यांना सेवा देण्यास सांगावे असे आदेश दिले. त्यानुसार सहयोग नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विनाविलंब आपले कर्मचारी आणि विद्यार्थी घेऊन डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय गाठले. शासकीय रुग्णालयातील कर्मचारी आणि नर्सिंग सेवेत ते सहभागी होऊन रुग्णांना वाचवण्यासाठी शर्तीची प्रयत्न सुरू केले. त्यामुळे अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांचे प्राण वाचण्यासाठी मोठी मदत झाली. डॉक्टर संतूकरावं हंबर्डे यांच्या दूरदृष्टीकोणातून आणि समाजसेवी भूमिकेमुळे लोहा तालुक्यातील विषबाधा झालेल्या शेकडो रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी सहयोग नर्सिंग कॉलेजने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याने महाविद्यालयाचे कर्मचारी , विद्यार्थी आणि डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांचेही समाजातून कौतुक होत आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड