शेतकऱ्यांना अच्छे दिवस आणणारा अर्थसंकल्प : डॉ
संतुकराव हंबर्डे
राज्य सरकारने आज सादर केलेला अतिरिक्त अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जीवनात अच्छे दिवस आणणारा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांचे विजपंपाचे वीज बिल पूर्णतः माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतानाच राज्य सरकारने यापुढे वीज पंपासाठी पूर्ण वीज मोफत पुरवठा करण्याचा संकल्प केला आहे. एवढेच नाही तर महिला सक्षमीकरणासाठी लेक लाडकी सारखी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे . बेरोजगार युवकांनाही अर्थसहाय्य करण्याचे अनुषंगाने महत्त्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आले. प्रत्येक महिलेला आता दीड हजार रुपये महिना अर्थसहाय्य करण्याचा घेतलेला निर्णय महाराष्ट्राला विकासाच्या नव्या वाटेवर नेणारा आणि महिला सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची नवी नांदी ठरेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांनी व्यक्त केला आहे.