नांदेड दि.२४: सध्या नांदेड जिल्हयामध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागु झालेली असुन त्याचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच या काळामध्ये कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहण्यासाठी पोलीस यंत्रणा सर्व बाजूनी लक्ष ठेवून आहे. सर्वत्र सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाने सोशल मिडीयावर पोस्ट टाकणाऱ्या समाजकटंकावर नजर ठेवण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन, पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे सोशल मिडीया मॉनिटरींग सेलची स्थापना केलेली असुन या सेलव्दारे (रात्र-दिवस) 24×7 सोशल मिडीयावर प्रसारीत केले जाणारे पोस्टची पाहणी करण्यात येते.
निवडणूक आयोगाला याची जाणीव आहे की निहित हितसंबंध असलेल्या व्यक्ती बल्क् एसएमएस किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे आक्षेपार्ह संदेश प्रसारित करू शकतात जे निवडणूक कायदे, आदर्श आचारसंहिता आणि आयोगाने जारी केलेल्या सूचनांचे उल्लंघन करून निवडणुकीच्या प्रक्रियेला बाधा आणू शकतात. निवडणूक भयमुक्त, निष्पक्ष आणि शांततेत पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार नांदेड पोलीस दलाकडून मोबाईल क्रमांक नागरिकांना तक्रार करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
नांदेड जिल्हाचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नांदेड जिल्हयातील नागरिकांना आवाहान केले आहे की, मतदान संपण्याच्या 48 तासांदरम्यान जर नागरिकांना निवडणूक प्रचारचे, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणारे, आक्षेपार्ह पोस्ट बॅनर व आचार संहितेचे उल्लघंण होणारे किंवा इतर सोशल मिडीया प्लॅटफॉमव्दारे कॉल, बल्क् एसएमएस, व्हाट्अप मेसेजेस, पोस्ट येतील तर त्यांनी निर्भयपणे मोबाईल क्रमांक 8308274100 यावर Whatsapp / फोनव्दारे जशा प्रकारची माहिती आली आहे तशीच माहिती पाठविणाऱ्याचे माहितीसह फॉरवर्ड करावी. माहिती देणाऱ्याचे नाव व पत्ता गोपनीय ठेवण्यात येईल. तसेच पोलीस प्रशासनाकडून योग्य ती चौकशी करुन असे संदेश पाठविणाऱ्याचा शोध घेवून भारतीय दंड संहिता, लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1951, निवडणूक नियम 1961, सुचना/निर्देश यांच्या संबंधित तरतुदीनुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड