जानापुरी येथील बालाजी कदम जानापुरी कर यांनी घेतली केंद्रीय मंत्री गडकरींची भेट
नांदेड दि.१: केंद्रीय रस्ते व वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिनांक एक सप्टेंबर रोजी नागपूर येथे जानापुरी तालुका लोहा येथील शिष्टमंडळाने भेट घेत नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 361 वरील जाणापुरी येथील ओहर ब्रिज प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी श्री.गडकरी साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत विनाविलंब संबंधित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.उपस्थित सामाजिक कार्यकर्ते मोतीराम काळे पांडुरंग कदम उत्तम कदम भुजंग कदम प्रभाकर कदम बालाजी कदम हे उपस्थित होते
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जानापूरी हे गांव राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ वर आहे हे गाव तुळजापूर ते लातूर ते नांदेड ते बुट्टीबोरी या रस्त्यावर आहे. या गावची वस्ती हि दोन्ही बाजुने आहे तसेच या गावावरुन १०ते १२ गावाची ये-जा तसेच शाळा, कॉलेज, बँकेला जाणे-येणे व पुर्वेकडे रत्नेश्वरी देवीचे मंदीर आहे. या मंदीराच्या दर्शनासाठी हजारो लोक या रस्त्याकुँन ये-जा करतात. तसेच या गावावर ओव्हरब्रीज नसल्यामुळे १० ते १२ अपघात होऊन अनेक जण मृत्यु झाले आहेत.
तर अनेकांचा अपघात होऊन त्यांचे हात पाय निकामी झालेले आहेत. त्यामुळे सदरील ठिकाणी ओव्हर ब्रीज होणे आवश्यक असून या ठिकाणी ओव्हरब्रीज च्या कामासाठी तात्काळ मंजूरी द्यावी व येथील अपघात टाळण्यासाठी त्वरीत उपाय योजना करावी अशी मागणी मोतीराम काळे पांडुरंग कदम भुजंग कदम बालाजी पाटील कदम जानापुरीकर उत्तम कदम प्रभाकर कदम यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने गडकरी यांच्याकडे केली आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड