तुषार कांबळे
हदगाव दि.२६: सध्या विधान सभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक मतदारसंघ घुसळून निघत आहे.नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा परंपरा गत मतदार संघ समजला जातो.माधवराव पाटील जवळगावकर हे मागच्या निवडणुकीत काठावर निवडून आले.माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर काही लोकप्रतिनिधींनी तळ्यात मळ्यात अशी भूमिका घेतली.जवळगावकरांच्या बाबतीत असेच घडले.त्यामुळे ते दावेदार असले तरी या मतदारसंघातातून कोणाची वर्णी लागेल सांगता येत नाही.त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदे गटाचे बाबुराव कदम हे तयारी करीत आहेत.परंतु तीन वेळेस त्यांचा पराभव झालेला आहे.शिवाय पक्षश्रेष्ठी त्यांच्या साठी फारसे अनुकूल नाहीत असे बोलले जाते.अशा परिस्थितीत महायुतीचे एक सुशिक्षित आणि विनम्र असलेले प्रा.कैलास राठोड यांचे नाव पुढे येताना दिसते.
मागील सहा महिन्यापासून हदगाव विधानसभा क्षेत्रात महायुतीकडून कार्य करत असलेले प्रा. कैलास राठोड हे आज घडीला विधानसभेचा परिपूर्ण चेहरा म्हणून नावारूपाला आलेला आहे अशी चर्चा तळागाळापर्यंत सर्व मतदारांमध्ये होत आहे.
राठोड केमिस्ट्री क्लासेस नांदेड च्या माध्यमातून लाखाहून अधिक विद्यार्थी डॉक्टर इंजिनिअर व अधिकारी घडविलेले राठोड यांनी 2009 पासून राजकीय क्षेत्रात राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात कार्यरत आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य व वसंतराव नाईक तांडा वस्ती विकास समितीचे अध्यक्ष, ओबीसी विभागाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य असे अनेक पद भुषविल्यानंतर साहेबा सोबतच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बंजारा बहुल भागामध्ये लोकसभा व विधानसभा च्या अनेक निवडणुकीमध्ये कार्य केले. मागील सहा महिन्यापासून हदगाव विधानसभेमध्ये माहिती सरकारच्या सर्व योजनांच्या माध्यमातून गावोगावी भेटी दिल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना , वयोश्री योजना , तीर्थदर्शन योजना व महायुती सरकारच्या इतर अनेक योजनांची माहिती गावोगावी वाडी तांड्यापर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले. विधानसभेतील 31 शेतकऱ्यांना कृषिरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले. मतदारसंघांमध्ये प्रत्येक गावात कैलास राठोड सरांनी घडवलेला विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे ही त्यांच्या कार्याची पावती आहे. कुठल्याही गरीब घटकाचे शैक्षणिक किंवा आरोग्य विषयक काम असेल तर ते स्वतः होऊन त्यांची कामे करीत असतात. गेल्या काही महिन्यांपासून राठोड यांनी मतदारसंघांत भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत.या मतदार संघात बंजारा समाज मोठ्या प्रमाणात असून त्यांनी राठोड यांना निवडून आणण्यासाठी कंबर कसलेली दिसते.उच्च शिक्षित, निगर्वी, सर्वांना सोबत घेऊन चालणारा म्हणून त्यांची प्रतिमा आहे.बंजारा, आदिवासी,दलित तसेच इतर समाजबांधवांचा त्यांना पाठिंबा आहे,असे बोलले जाते.त्याच त्या चेहऱ्यांना लोक कंटाळले असून शिंदे गटाकडून राठोड यांना तिकीट मिळाले तर ते हमखास निवडून येतील अशी चर्चा आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड