नांदेड दि.११ :स्वच्छ भारतासाठी स्वयंप्रेरणा आणि सामूहिक कृतीला बळकटी देण्यासाठी २०१७ पासून वार्षीक स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवाडा साजरा केला जातो. केंद्र शासनाच्या सुचनानूसार यावर्षी दि.१७ सप्टेंबर ते दि.02 ऑक्टोबर २०२४, दरम्यान स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवाडा आयोजित करण्यात आला असून या वर्षी “स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता ” नामे हे अभियान राबविण्यात येणार आहे.
शहरातील मोठ्या प्रमाणावर गलिच्छ व अस्वच्छ ठिकाणे साफ करण्यासाठी स्वच्छता मोहिम राबविणे. या मोहिमेस नागरिकांचे समर्थन व सहभाग, स्वच्छता कामगारांच्या योगदानाची ओळख, भारतातील स्वच्छता आणि शाश्वत कचरा व्यवस्थापन भविष्यासाठी वचनबध्दतेची पुष्टी करणे असे स्वच्छता ही सेवा (SHS) २०२४ अभियानाचे उद्दिष्टे आहेत.
सदरील मोहिमेच्या अनुषंगाने व शासनाच्या मार्गदर्शन सुचनानूसार आज दि.१० सष्टेबर रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोइफोडे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांसह अभियान नियोजनाची बैठक घेतली.
सदरील बैठकिस अतिरीक्त आयुक्त, सर्व उपआयुक्त, लेखा व वित्त अधिकारी, सहाय्यक नगर रचनाकार, शिक्षण अधिकारी, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता (सा.बांधकाम, पापूवजनि) सर्व क्षेत्रिय अधिकारी, सहाय्यक आयुक्त (स्वच्छता), उपअभियंता विद्युत भांडार अधिक्षक, व सर्व स्वच्छता निरीक्षक हे उपस्थीत होते. सदरील बैठकित शहरातील अस्वच्छ भाग, रस्ते, चौक, रहिवासी भाग, तसेच गोदावरी नदी घाट, श्री गुरुगोविंदसिंघजी अशा विविध ठिकाणी स्वच्छता शपथ घेत विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. सदरील अभियानाचे दि.१७ सष्टेबर रोजी उद्घाटन करण्यात येणार असुन दि.२ ऑक्टोबर २०२४ रोजी स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात येणार आहे. उक्त अभियान कालावधीतील विविध स्वच्छता मोहिमेचे / उपक्रमाचे वेळापत्रक लवकरच नांदेड मनपाच्या संकेतस्थळवर व सर्व क्षेत्रिय कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
या अभियानाच्या अनुषंगाने शहरातील सर्व नागरीकांना, व्यवसायीकांना,शासकिय- निमशास्कीय, खाजगी कार्यालयीन कर्मचारी, NGO सभासद, बचतगट सभासद, स्वयंसेवा संस्था, सेवाभावी संस्था, NCC, शाळा – महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी, वर्गास व इतर स्वच्छता प्रेमीना दि.१७ सप्टेंबर ते दि.२ ऑक्टोबर २०२४, दरम्यान आयोजित स्वच्छता ही सेवा (SHS) 2024 अभियानात स्वयंस्फुर्तीने अमुल्य सहभाग नोंदविण्यास महानगरपालिका प्रशासना तर्फे अवाहन करण्यात येत आहेत.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड