कॉलनी वाशीयांनी राबविला ईतरांनी आदर्श घ्यावा असा उपक्रम.
नांदेड : दि.१४ : येथील सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या हनुमानगड परिसरातील नाथनगरातील गल्ली नंबर ३ हा परिसर व कॉलनी सीसीटीव्ही यंत्रणेच्या उभारणीतून ईन-कॅमेराच्या कक्षेत आले असून तेथील स्थानिक रहिवाशांनी वर्गणी जमा करून हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे हे काळाची गरज असून यामुळे सुरक्षितता निर्माण होते आजच्या घडीमध्ये चोरी मारामारी यासारख्या घटना घडत आहेत. तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे या घटनेवर आळा बसतो अशी माहीती यावेळी येथील स्थानिक रहीवाशांनी दिली आहे .
नाथनगरातील गल्ली नंबर ३ येथे एकूण सात कॅमेरेे बसविल असून कॉलनीच्या सुरुवातीपासून ते कॉलनीच्या शेवटपर्यंतचा संपूर्ण परिसरत हा कॅमेरात कव्हर होत आहे.
हा स्थानिक रहीवाशांनी राबविलेला एक आदर्श उपक्रम असून शहरातील ईतर भागातील नागरीकही या बाबीचे अनुकरण करू शकतात असा हा उपक्रम आहे कारण आपल्या परिसरात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या व वाईट घटकांवर आपली एकप्रकारे प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष नजरच असते असे यावरून म्हणता येईल या राबविलेल्या विशेष उपक्रमाबद्दल कॉलनीतील सर्व रहिवाशांनी झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलेले आहे.तसेच सर्व स्थानिक रहिवाशांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी आर्थिक सहकार्य केल्यामुळे येथील रहिवासी किरण अप्पाराव बंडे यांनी सर्व नागरिकांचे आभार मानले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड