धर्माबाद दि.२९ ता .प्र. दत्तात्रय सज्जन : लोकसभा निवडणूक नुकतीच संपली असून आता विधानसभेची वेळ आली असून अवघ्या काही दिवसात निवडणूक आयोगाकडून निवडणूक होण्याचे स्पस्ट संकेत मिळत असून नायगाव विधानसभा निवडणुकीसाठी उत्सुकांनी मोर्चे बांधणी देखील सुरु केली असून कोण निवडणूक लढवणार हे मात्र येणारी वेळच सांगू शकेल परंतु उत्सुक असलेल्यामध्ये एक नवीन नाव प्रामुख्याने पुढे येत आहे, हे नाव म्हणजे उमरी तालुक्यातील गोरठा गावचे भूमिपुत्र डॉ. माधव विभुते हे होय.
डॉ. माधव विभुते हे उमरी शहरातच नव्हे तर अवघ्या नांदेड जिल्ह्यात त्यांचा नावलौकिक असून नायगाव मतदार संघाचा भोगोलिक नकाशा जर पाहिला तर नायगाव व धर्माबाद ह्यामध्ये उमरी तालुका आहे, उमरी तालुका हा नायगाव व धर्माबाद तालुक्याचे केंद्रबिंदू आहे, डॉ. विभुते यांनी परी हॉस्पिटलच्या माध्यमातून मतदार संघात एक उत्कृष्ठ स्त्री रोग तज्ञ डॉक्टर म्हणून नावाजलेले आहेत. जेव्हा एखाद्या वेळी रुग्णावर कठीण प्रसंग येतो त्यावेळी डॉ. विभुते हे आपले कर्तव्य सरकारी दवाखाना असो की कुठलेही ठिकाण असो, डॉक्टर ह्या नात्याने माणुसकी बाळगत धावत जातात. त्यांनी उमरी सारख्या शहरात अल्प किमतीत गरोदर मातांसाठी सी सेक्शन सारखी सेवा उपलब्ध करून दिली आहेत त्याच बरोबर सामाजिक सेवेत देखील डॉ. विभुते आपला सहभाग नोंदवत सर्व धार्मियांशी जवळील साधली आहेत. पैसे असो अथवा नसो डॉ. विभुते यांचा दवाखाना जनु सरकारी दवाखाना असल्याचे प्रतिबिंबित होते.
असे हे आदर्श व्यक्तिमत्व असणारे डॉ. विभुते हे लिंगायत समाजाचे प्रतिनिधित्व करत असून त्यांना सर्व समाजातील नेते कार्यकर्ते अगदी जवळून ओळखत असून
त्यांना मोठा जनाधार देखील प्राप्त झाला असून आगामी नायगाव विधानसभा निवडणूक त्यांनी लढवावी अशी सर्व समाजातील कार्यकर्त्यांची मागणी सध्याला जोर धरत आहे, सध्या तरी विभुते हे राजकीय पटलावर नसले तरी आगामी काळात मात्र ते राजकीय भूमिकेत दिसले तर नवल वाटू नये.
नायगाव विधानसभा मतदार संघात लिंगायत समाज हा बहुसंख्येने असून त्याच बरोबर लिंगायत समाजाशी निगडित असलेला ओबीसी समाज देखील ह्या मतदार संघात आहे. त्याच समवेत मराठा मुस्लिम यांचे देखील समर्थन विभुते यांना मिळत आहे.
आपल्या रुग्ण सेवेच्या माध्यमातून एक अंत्यत साधा व गरीब कुटुंबातील व्यक्ती असणारे डॉ.विभुते यांना मोठा करण्यात तत्कालीन आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचा मोठा हाथ आहे, त्यांना गोरठेकर यांचा मानसपुत्र म्हणून संबोधल्या जाते, अश्या ह्या विभुते यांना उमरी तालुकाच नव्हे तर पूर्ण मतदार संघातून मोठा जनाधार मिळत आहे. डॉ विभुते यांनी नायगाव विधानसभा मतदार संघ लढवावी सर्व धर्मीय नागरिकांतून होत आहे. त्यातच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांकडून त्याना निवडणूक लढवण्या संदर्भात विचारणा होत आहे, त्यांनी मात्र अद्यापही चुप्पी साधली आहे, मात्र नागरिकांच्या आग्रहास्तव ते आगामी काळात ते कुण्या पक्षांकडून निवडणूक लढले तर नवल वाटायला नको.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड