नांदेड,१९ :”छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या जयंती निमित्त नांदेड शहरातील शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्या स्थळी महापालिकेतर्फे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाने निर्देशीत केल्याप्रमाणे सर्वप्रथम शिववंदना घेऊन महाराजांना अभिवादन करण्यात आले.तदनंतर पोलीस बँड पथका मार्फ़त महाराष्ट्र राज्यगिताचे वाजन करून महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करून मान्यवरांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली.
याप्रसंगी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह उपायुक्त सौ.सुप्रीया टवलारे, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, शहर अभियंता सुमंत पाटील,कार्यकारी अभियंता विश्वनाथ स्वामी, शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी, सिस्टीम मॅनेंजर सदाशिव पतंगे, सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादेक,उद्यान अधिक्षक तथा क्षेत्रिय अधिकारी डॉ.मिर्झा बेग, स्टेडियम व्यवस्थापक तथा क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे,रावण सोनसळे, गौतम कवडे यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
जनसंपर्क विभाग, नां.वा.श.म.न.पा.नांदेड
#सत्यप्रभा न्युज #नांदेड