नांद आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे व अतिरीक्त आयुक्त गिरीष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त (महसुल) डॉ.पंजाब खानसोळे यांच्या नियंत्रनाखाली क्षेत्रिय कार्यालय तसेच नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व मालमत्ताधारकांना आवाहन करण्यात येते की, मालमत्ता कर सुट व थकबाकी शास्ती सुट योजनेचा नागरिकांना लाभ घेता यावा याकरिता सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी परिसरातील नागरीकांना आहवान करुन मालमत्ता कर थकबाकी वरील ४० टक्के शास्ती माफीचा फायदा देण्यात येत आहे.
तसेच आज दि.14 जानेवारी रोजी क्षेत्रीय कार्यालयातील कर भरणा वजिराबाद चौक येथे सकाळी 9.00ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत 38 मालमत्ता धारकांनी व विशेष पाणी कर 04 मालमत्ता असे एकूण 42 मालमत्ता धारकांनी कॅम्प मध्ये नगदी रू.5,44,183/- व धनादेशाने रू.7,01,226/- असे एकूण रू.12,46,012/- वसूल झाले आहे करिता नागरिकांनी मालमत्ता कर व पाणी कराच्या थकबाकी शास्तीमध्ये ४० टक्के सुट योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. अधिकारी चे नाव नंतर संजय जाधव सहाय्यक आयुक्त, गौतम कवडे,अझर अली,कर निरीक्षक रफिक, महेंद्र नागरे,भरत रत्नपारखे, लखन कुंटे, व्यंकट गायकवाड, नारायण आठवले, ईरशाद, गोपाळ चव्हाण वसुली लिपिक उपस्थित होते व सर्व शिपाई उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड