नांदेड दि.६: मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी आपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत अवैध जनावरांची वाहतुक करणारे इसमांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने पोनि श्री लक्ष्मण व्यंकटराव केंद्रे, पोस्टे मुखेड हद्दीत आपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत कार्यवाही करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, बेटमोगरा गावाकडुन सलगारा फाटयाकडे एका पिकअप वाहनांमध्ये गोवंश जातीचे जनावरे कत्तलीसाठी घेवुन जात असल्याचे खात्रीशीर माहीती मिळाल्याने सोबत अंमलदार घेवुन सापळा लावुन थांबले असता दि.९ सष्टेबर रोजी चे पाहाटे ५ वा. चे सुमारास एक पिकअप वाहन क्रमांक एमएच २६ बीई ५०५६ हा येत असलेला दिसला असता त्यास थांबवुन वाहन तपासणी केली असता आत ८ गाय व कारवड किंमत १,२,०० व दोन मोबाईल १६,०० /- वाहन किंमत 1,50,000 असा एकुण २,६८,०० /- रू चा मुद्देमाल आरोपी नामे अहमद युसूफ कुरेशी, वय २७ वर्षे, व्यवसाय चालक रा. कासराळी ता. बिलोली जि. नांदेड नयुम अजमुदीन कुरेशी, वय २९ वर्षे व्यवसाय जनावरे खरेदी विक्री रा. बेटमोगरा ता. मुखेड मोहदु अब्दुलसाब कुरेशी रा. बेटमोगरा ता. मुखेड जि. नांदेड यांचे ताब्यातुन जप्त करून सदर जनावरे गोशाळा मुखेड येथे जमा करण्यात आले आहेत. सदर तीन आरोपी विरूध्द पोस्टे मुखेड गुरन ३०२ / २०२४ हा विवीध कलमा प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री खंडेराय धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, मा. श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री संकेत गोसावी, उपविभागीय पोलीस अधीकारी उपविभाग देगलुर, यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री लक्ष्मण केंद्रे, सपोउपनि पोकले, पोकों गजलवाड, होमगार्ड उत्तम कांबळे, अनिल राठोड, परमेश्वर नाईकवाड, राजेश वाघमारे यांनी पार पाडुन चांगली कामगीरी केली आहे. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड