नांदेड मुदखेड ता प्र दि.१०: मुदखेड शहरातील युवानेतृत्व, काँग्रेस युवक निष्ठावंत कार्यकर्ते मुजीब घुडुखान पठाण यांची मुदखेड शहर युवक काँग्रेस अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
तर युवक कॉग्रेस तालुका उपाध्यक्ष पदी विजय मेटकर यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाढे पाटील यांच्या उपस्थितीत दि.८ एप्रिल २०२४ रोजी शहरातील काँग्रेस पक्ष कार्यालय येथे छोट्या खाणी पद नियुक्तीचा कार्यक्रम घेऊन पदाची निवड करण्यात आली.
व तसेच दि. ९ एप्रिल रोजी काँग्रेस पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत चव्हाण यांच्या प्रचारार्थ प्रचार कार्यालयाचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती करण्यात आले.
प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाचे औचित्य साधुन नवनिर्वाचित युवक कॉग्रेस शहराध्यक्ष मुजीब घुडुखान पठाण यांच्या उपस्थितीत अविनाश चोदंते शहर उपाध्यक्ष, तर आकाश सोनटक्के शहर साचिव पदी यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर, शहर अध्यक्ष कैलास गोडसे, पिंटू पाटील वासरीकर तालुकाध्यक्ष शिवसेना उ.बा.ठा. गट, विश्वभर पा.पवार, शहर अध्यक्ष अविनाश झमकडे, अंकूश मामीडवार, सचिन चंद्रे, माजी नगराध्यक्ष राजबहादूर कोत्तावार, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे,माजी नगरसेवक करीम खासाब, इलीयास आब्बासी,मो. गौस अब्दुल नबीसाब, तेजाब पाटील मुंगल, सुर्यकांत चौदंते,गंगाधर सावंत,गीरीष कोत्तावार, रमेश बोडके, सतीश पाटील डोंगरगावकर, राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे ) केशव मुंगल, एकबाल कुरेशी, साहेबराव चव्हाण,
राहुल आठवले, किशोर पिल्लेवाड, राजेश इंजेवाड, बालाजी गुळेवाड,सुभाष चौदंते,प्रशांत कवळे,
सुधाकर सुर्यवंशी, ऋषिकेश चौदंते, उपेंद्र देवदे,यांच्या सह मुदखेड तालूका व शहर काँग्रेस कमिटी व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड