हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- शहरातील लकडोबा चौक येथील वैकुंठधाम स्मशान भूमीला लोकनेते बाबुराव कोहळीकर यांनी आज दि 9 डिसेंबर रोजी भेट देऊन खासदार हेमंत भाऊ यांच्याशी वैकुंठ स्मशानभूमीच्या विकास कामासाठी जास्तीत जास्त निधी देण्याची फोन द्वारे मागणी केली त्यामुळे लोकनेते बाबुराव कदम साहेबांच्या पाठपुराव्याने येथील वैकुंठधाम स्मशानभूमीला लवकरच 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन खासदार हेमंत पाटील यांनी कमिटीचे अध्यक्ष शाम ढगे यांना दिले व लवकरच खासदार हेमंत भाऊ यांनी स्मशान भूमी ला भेट देणार असल्याचे आश्वासन दिले
या बाबत सविस्तर वृत्त असे की स्मशानभूमी म्हटल की, डोळ्यापुढे येतो तो शेवटचा क्षण अंत्ययात्रा व त्या अंत्ययात्रेत समाविष्ट झालेले हजारो लोक आजूबाजूला समशान शांतता हे असं एकंदरीत चित्र, मात्र असं काहीसं चित्र. हिमायतनगर शहरातील लकडोबा चौक येथील हिंदू वैकुंठधाम स्मशानभूमी या सर्व गोष्टीला अपवाद ठरत आहे.या स्मशान भूमी मध्ये येथील स्मशानभूमी कमिटी कडून प्रत्येक सदस्याचा वाढदिवस स्मशानात करून समाजा मध्ये एक वेगळा संदेश देण्याचे काम होत आहे व दर रविवारी सकाळी सर्व कमिटी कडून दोन तास नित्य श्रमदान करून येथील परिसर स्वच्छ करण्याचे कामते करत आहेत येथील कमिटी कडून समाजात स्मशाना बद्दल वेगळी ओळख निर्माण करून देण्याचे काम होत आहे त्यामुळे आज दि 9 डिसेंबर रोजी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी येथील स्मशानभूमीला भेट देऊन येथे अर्धा तास निवांत बसून येथील कमिटी सोबत त्यांनी विकास कामाची चर्चा केली व हिंगोली लोकसभेचे कार्यसम्राट खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्याशी त्यांनी कमिटीचे अध्यक्ष श्याम ढगे यांची फोनवरून चर्चा करून दिली तेव्हा खासदार हेमंत पाटील यांनी येथील स्मशानभूमीच्या विकास कामासाठी लवकरच डी.पी.आर. तयार करून एक कोटी रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले त्यामुळे हिमायतनगर येथील वैकुंठधाम स्मशान भूमी परिवाराकडून खासदार हेमंत भाऊ पाटील व लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले यावेळी हदगाव हिमायतनगर विधानसभा संघटक बालाजी राठोड,शिवसेना तालुका प्रमुख हदगाव विवेकराव देशमुख,तालुका प्रमुख हिमायतनगर रामभाऊ ठाकरे, उपचेअरमन निवघा सुदर्शन पाटील, मा.जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव लांडगे,बाबुराव कदम,शिवसेना शहर अध्यक्ष गजानन हरडपकर,राजेश जाधव,सह वैकुंठधाम स्मशान भूमी परिवाराचे सर्व सदस्य व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते