Motorola Edge 60: तुम्ही बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधत असाल तर तुमच्यासाठी ही एक महत्वाची अपडेट आहे. मोटोरोला कंपनी तुमच्यासाठी धमाकेदार स्मार्टफोन घेऊन आलाय. मोटोरोला एज 60 सिरीजमध्ये आणखी एक स्टायलिश स्मार्टफोन भारतात लाँच झालाय. या फोनमध्ये खूप काही खास असणार आहे. त्यामुळे टेक जगतात या स्मार्टफोनची चर्चा आहे. या स्मार्टफोनने सॅमसंगच्या स्मार्टफोनला तगडी स्पर्धा दिलीय. काय आहे यात खास? सविस्तर जाणून घेऊया.
मोटोरोला एज 60 फोनमध्ये स्टायलस पेन सपोर्ट मिळतोय. हे पाहून अनेक यूजर्सना सॅमसंग गॅलेक्सी नोट मालिकेची आठवण येईल. मोटोरोलाचा हा नवीनतम स्मार्टफोन मध्यम बजेट किंमतीच्या श्रेणीत लाँच करण्यात आलाय. फोनमध्ये pOLED डिस्प्ले, 5000mAh बॅटरी, फास्ट चार्जिंगसह अनेक शक्तिशाली फिचर्स देण्यात आले आहेत. मोटोरोला एज 60 स्टायलसमध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबीच्या सिंगल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये देण्यात आलंय. याची किंमत 22 हजार 999 रुपये आहे. हा फोन तुम्हाला पॅनाटोन सर्ट द वेब (Panatone Surt the Web) आणि पॅनाटोन जिब्राल्टर सी (Panatone Gibraltar Sea) या 2 रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन 23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल. पहिल्या सेलमध्ये फोन खरेदीवर 1 हजार रुपयांची बँक सवलत दिली जातेय.
हा मोटोरोला फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7एस जेन 2 प्रोसेसरवर चालतो. या फोनमध्ये 8 जीबी एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256 जीबी यूएफएस 2.2 स्टोरेज देण्यात आलंय. हा फोन अँड्रॉइड 15 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. कंपनी या फोनसोबत 2 वर्षांची ओएस आणि तीन वर्षांचे सिक्योरिटी अपडेट देतंय. यामध्ये ऑन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. मोटोरोला एज 60 स्टायलसमध्ये 68W यूएसबी टाइप सी फास्ट चार्जिंग फीचरसह 5 हजार एमएएचची शक्तिशाली बॅटरी देण्यात आलीय. या फोनमध्ये 6.67-इंचाचा पॉलईडी 2.5डी डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्यूशन 2712×1220 पिक्सेल आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 120 हर्ट्झच्या उच्च रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच त्याची कमाल ब्राइटनेस 3 हजार निट्स पर्यंत आहे. याशिवाय डिस्प्लेचा टच सॅम्पलिंग रेट 300 हर्ट्झ आहे. डिस्प्लेसाठी त्यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 देण्यात आलाय.
या स्मार्टफोनच्या मागील बाजूस व्हेगन लेदर फिनिशिंग देण्यात आलंय. हे फिनिशिंग त्याच्या दोन्ही रंगामध्ये दिसेल. या फोनचे वजन 191 ग्रॅम आहे असून IP68 वॉटर आणि डस्ट प्रूफ आहे. या फोनमध्ये मिलिटरी ग्रेड MIL-STD-810H प्रोटेक्शन देण्यात आलंय. फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. या स्मार्टफोनच्या कॅमेराबद्दल सर्वात जास्त चर्चा होतेय. मोटोरोलाच्या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य OIS कॅमेरा, 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 3 इन 1 लाईट सेन्सर कॅमेरा देण्यात आलाय. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या मोटोरोला फोनमध्ये 32MP कॅमेरादेखील आहे.