नांदेड दि.२१: लॉयन्स क्लब नांदेड, शासकीय आयुर्वेदीक रुग्णालय आणि नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांचा संयुक्त विद्यमाने या वर्षी मोफत प्लास्टिक सर्जेरी कॅम्पचे आयोजन दिनांक ९ व १० डिसेंबर रोजी ठेवण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नाकावरील बाह्य विकृती, चेहऱ्यावरील व्रण व डाग, दुभंगलेले ओठ आणि डोळ्यावरील पडलेली पापणी इत्यादींवर अमेरिका येथील डॉ राज लाला आणि त्यांचा पत्नी डॉ ललिता राजलाल हे दाम्पत्य मोफत इलाज तथा गरज पडल्यास शस्त्रक्रिया करणार आहेत.
लॉयन्स क्लब तर्फे गेली ३७ वर्षांपासून या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या वर्षी हे ३८ वे वर्ष आहे. या पूर्वी अमेरिकेहून पद्मश्री स्व. डॉ शरद दीक्षित हे दरवर्षी येऊन ही सेवा देत असत. डॉ दीक्षित यांच्या निधनानंतर त्यांचे शिष्य डॉ राजलाला आणि त्यांचा पत्नी डॉ ललिता राजलाला हे सेवा देत आहेत. त्यामुळे लॉयन्स क्लब तर्फे आता डॉ दीक्षित यांच्या स्मरणार्थ सदर शिबिराचे आयोजन करण्यात येत असते.
तरी गरजूंनी दिनांक ९ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय, कलामंदिर जवळ येथे येऊन नोंदणी करावी आणि या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन लॉयन क्लब चे अध्यक्ष लॉ डॉ अशोक कदम तथा प्रोजेक्ट चेअरमन लॉ डॉ ज्योती जांगीड यांनी केले आहे. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड