हिमायतनगर प्रतिनिधी/- हदगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये निवडणुकीचे वारे चांगलेच वाहू लागले आहे पण विद्यमान आमदारांनी ह्या भागात विकास कामाचा सपाटा सुरू केला आहे शारदीय नवरात्र महोत्सवाच्या घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर दि 3 ऑक्टोबर रोज गुरुवारी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी तालुक्यातील मौजे जवळगाव सिल्लोडा- शिरपल्ली, बोरगडी, धानोरा सह हिमायतनगर शहरात विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न केले यावेळी बोलताना आमदार जवळगावकर यांनी असे सांगितले की हिमायतनगरच्या विकासासाठी मी अगोदर पण निधी कमी पडू दिला नाही आणि ह्या पुढे पण पडू देणार देणार नाही असे सांगितले
याबाबत सविस्तर वृत्त असे की हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी हिमायतनगर शहरासह तालुक्यातील विविध विकासकामे केली आहेत ती सर्वांसमोर पाहायला मिळतातच आणि त्यात अजून भर म्हणून त्यांनी दिनांक 3 ऑक्टोबर रोज गुरुवारी नवरात्र महोत्सवाच्या घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर हिमायतनगर शहरातील श्री कालिंका माता देवी येथील मंदिरात देवीची घटस्थापना ,अलंकार सोहळा व महाआरती करून तालुक्यातील सिल्लोड शिरपल्ली, बोरगडी, धानोरा सह हिमायतनगर येथील विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न केला यावेळी उपस्थित असलेल्या भाविक भक्तांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा देऊन शहरातील कालिंका माता देवीच्या चरणी माझ्या मतदारसंघातील शेतकरी बांधवांना व नागरिकांना सुखी समाधानी व त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी मनोकामना करून माता कालिंका देवीकडे साकडे घातले यावेळी श्रीकालिंका माता देवी ट्रस्ट कमिटी कडून त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर त्यांनी विविध विकास कामाचे भूमिपूजन केले यावेळी काँग्रेस कमिटीचे प्रकाश वानखेडे, तालुका अध्यक्ष गजानन सूर्यवंशी,शहर अध्यक्ष संजय माने, धानोरा सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन गणेश शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्दन ताडेवाड, माजी संचालक रफिक भाई, प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर तुंगेवार साहेब, शासकीय गुत्तेदार सुरेश पळशीकर ,सुभाष शिंदे, नितेश जैस्वाल, आंबेकर, परमेश्वर गोपतवाड, नवनिर्वाचित खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाळू पाटील , योगेश चिल्कावार,बबलू डांगे, पापा पार्डीकर ,पंडित ढोणे, सह तालुका व शहर काँग्रेस व युवक काँग्रेस, महिला काँग्रेस अल्पसंख्यांक काँग्रेसचे सर्व सरपंच ,उपसरपंच, गावकरी व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते