नांदेड दि.१३: माऊली चालती पंढरीची वाट पायी वारीत आमदार माधवराव पाटील जवळगावकर सहभागी झाले मिळालेला उत्साह पुन्हा अनुभवण्यासाठी एकादशीच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा वारीमध्ये सहभागी होण्याचे भाग्य मला मिळाले. वारकरी बांधवांच्या भक्तीचा अचाट महिमा अनुभवण्याचे क्षण मला गेली अनेक वर्ष वारीत सहभागी होण्यासाठी प्रेरीत करणारे होते, अनेक शेतकरी बांधव देखील दरवर्षी पंढरपूरची पायी वारी करतात, त्यांच्यासोबत एक दिवस चालून त्यांचे सुख दुःख अनुभवले आणि संवाद साधला. या वारीतली सकारात्मक शक्ती अनुभवताना डोळे दिपून गेले. वारीसोबत चालण्याचे ते क्षण म्हणजे एका भक्तीमय समारंभाचेच दर्शनच म्हणावे लागेल. कोणत्याही अपेक्षेशिवाय केवळ लाडक्या विठू माऊलीच्या ओढीने तहान भूक विसरून वारीत सहभागी होणारा प्रत्येक भक्त म्हणजे एक वेगळीच अनामिक शक्ती असल्याचे जाणवत होते.
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । माझिया सकला हरिच्या दासा ।। कल्पनेची बाधा न हो कोणे काळी । ही संत मंडळी सुखी असो ।।
अशीच भावना मनात आली.
या वारी दरम्यान माझे सहकारी अनिल पवार पंजाबराव पाटील खेरगावकर, पंजाबराव पाटील होकरणीकर उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड