विजय पाटील
छत्रपती संभाजीनगर दि.२६ : छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अतुल सावे यांनी शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) उमदेवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडे एकूण ३९ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे म्हटले आहे.
स्वतः आ. सावे यांच्याकडे २१ कोटी ९९ लाखांची जंगम मालमत्ता तर १० कोटी ५१ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे ७ कोटी २० लाखांची जंगम मालमत्ता आहे. रोख १ कोटी १६ लाख २३ हजार स्वतःकडे तर त्यांच्या पत्नीकडे १९ हजार ८८६ रुपये आहेत. दोन चारचाकी गाड्याही त्यांच्याकडे आहेत.
-आ. सावे यांच्याकडे ४ कॅरेटचा हिरा व ७ तोळे सोने आहे असून पत्नीकडे ५ कॅरेटचा हिरा आणि १० तोळे सोने आहे.
आ. सावे यांच्यावर ११ कोटी ३४ लाख ८९ हजार ६६६ रुपयांचे कर्ज असून, त्यांच्या पत्नीवरही १ कोटी ३६ लाख २४ हजार १९० रुपयांचे कर्ज असल्याचे म्हटले आहे. व्यापार उत्पन्नाचा स्त्रोत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. बी.कॉम.पर्यंत शिकलेल्या आ. सावे यांच्याविरुद्ध एकूण ३५ गुन्हे असून त्यातून ते मुक्त झाल्याचे म्हटले आहे.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर