नांदेड दि.११ : भक्ती लॉन्स मंगल कार्यालय नांदेड येथे, काँग्रेस पक्षाची विभागीय स्तरीय बैठक होती सदरील बैठकीला महाराष्ट्र प्रदेशाचे प्रभारी रमेश कथियाल, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,बाळासाहेब थोरात यांच्यासह डझनभर काँग्रेसचे नेते मंचावर उपस्थित असताना सकल मराठा समाजाचे आंदोलनकर्ते यांनी व्यासपीठाचा ताबा घेऊन मराठा आरक्षणाविषयी गुळमूळ भूमिका न घेता आपली व आपल्या पक्षाची ठोस भूमिका काय आहे ते तात्काळ कळवावी असा पवित्र घेतला, तेव्हा काही वेळासाठी मंचावर अचानक गोंधळ उडाला व काँग्रेसच्या कार्यकर्त्यापासून सर्वोच्च नेत्यापर्यंत सर्वांची तारांबळ उडाली पोलीस प्रशासनाने योग्य तो समतोल राखत परिस्थिती हाताळली.
आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी नांदेड येथे चार जिल्ह्याची विभागीय बैठक काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र प्रदेशाचे रमेश केतिनल यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेशने लावलेले काँग्रेसची ही बैठक नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांना तयारीला लागा असे आव्हान करण्यासाठी होती परंतु सदरील बैठकीमध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ताबा घेत थेट मंचावर जाऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विजय वड्डेटीवार,बाळासाहेब थोरात यांच्यासह नांदेड लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण माजी मंत्री सतेज पाटील, आमदार मोहनांना हंबर्डे आमदार माधवराव जवळगावकर या सेवा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष तालुका अध्यक्ष यांच्या सहसेकडून हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित असताना मराठा आंदोलकांनी जो पवित्रा घेतला त्यावेळी त्या ठिकाणी सर्वांचीच तारांबळ उडाली सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते हातात निवेदन घेऊन काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याविषयी थेट सवाल जवाब विचारला अशा आयत्यावेळी आलेल्या अचानक भयानक प्रश्नामुळे काँग्रेस नेते सुद्धा काही वेळासाठी भांबाळून गेले त्यांना उत्तर काय द्यावं हेच समजेना मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी हो म्हणावं तर ओबीसी नाराज आणि नाही म्हणावं तर मराठा समाज नाराज अशा दुहेरी विवांचलित अडकलेल्या काँग्रेसच्या नेत्यांची आज मात्र एक प्रकारचे सत्त्वपरीक्षा नांदेडकरांनी पाहिली असं म्हणायला हरकत नाही.
यावेळी मंचावर जाऊन निवेदन देत थेट सवाल जवाब करून मराठा आरक्षणाविषयीची काँग्रेस पक्षाने तात्काळ आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा समाजाला येणाऱ्या विधानसभेसाठी कोणता स्टॅन्ड घ्यायचा हे कळेल, लोकसभेला मनोज जरांगे पाटील यांच्या आशीर्वादाने सत्ता हस्तगत करणाऱ्या लोकसभेच्या जास्तीत जास्त खासदारांनी आतापर्यंत मराठा आरक्षणाविषयी ब्रश शब्द सुद्धा काढला नाही. आता असाच फायदा आम्हाला विधानसभेला सुद्धा होईल असा विचार जर काँग्रेस पक्षातील नेते करत असतील तर हे त्यांचे चुकीचे विचार आहेत. जर जरांगे पाटलांचा आदेश आला तर सत्ताधारी विरोधक या दोघांचाही सुपडा साफ करून महाराष्ट्र मधील जरांगे पाटलाची तिसरी आघाडी तयार करून महाराष्ट्राची सत्ता आम्ही आमच्या ताब्यात घेऊ पण मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण देऊ अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी मराठा समाजाचे मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांनी मीडियाला बोलताना दिली यावेळी उपस्थित आंदोलन करते दशरथ पाटील कपाटे सुभाष पाटील कोल्हे संकेत पाटील परमेश्वर पाटील नाना पाटील वानखेडे ऋषी पाटील वानखेडे शिवशंकर भोसले संभाजी भोसले विठ्ठल शिंदे अजिंक्य लोंढे बळवंत शिंदे देशमुख राज सरकार राजेश मोरे हनुमंत शिंदे जनार्दन शेजुळे मदन काळे यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड