छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी ! विजय पाटील !
दि : २२/०१/२०२४
मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज प्रभू श्रीरामाला साकडे घातले. मराठा आरक्षणाची मागणी मान्य झाल्यास आयोध्येला दर्शन घेण्यासाठी येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अहमदनगरमधील भिंगार येथे श्रीराम मंदिरात दर्शन घेवून त्यांनी ही माहिती प्रसार माध्यमांना दिली
मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण द्यावे या मागणीसाठी गेल्या ७ महिन्यांपासून आर पारची लढाई लढत असलेले संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे राजधानी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. अहमदनगरमधील भिंगार येथे श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. दरम्यान, सुपा येथेही मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आज रात्री पुणे जिल्ह्यातील
राजणगावमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम होणार आहे.
मुंबईच्या दिशेने लाखोंचा मराठा समुदाय निघालेला आहे.
ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात येत आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीतून या मराठा संघर्ष यात्रेला सुरुवात झाली. सुमारे २५ किलोमीटर लांबच लांब रांग पहायला मिळत आहे. ही यात्रा
आतशय शिस्तबद्ध पद्धतीने सुरु आहे. वाहतूकीला कुठलाही अडथळा येत नाही. ही यात्रा मुंबईत पोहोचून तेथे मनोज जरांगे पाटील उपोषणाचे हत्यार उपसून सरकारदरबारी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाझर फोडणार आहे. सुमारे ३ कोटी मराठे मुंबईच्या दिशेने निघाले असल्याचा दावा मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार नाही, असा निर्धार मनोज जरांगे पाटील
यांनी व्यक्त केला आहे. एकंदरीतच मराठा आरक्षणाची लोकशाही मार्गाने सुरु असलेली ही लढाई अंतिम टप्प्यात असून सकारात्मक मार्ग यावर निघणार असल्याचे बोलले जात आहे.
सत्यप्रभा न्यूज