Manoj Jarange, जालना : “आमच्या नरड्यात विष ओतण्याच काम केलं. देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने असलेला मराठा 24 कॅरेटचा असूचं शकत नाही. जाता जाता फडणवीस मराठ्यांच्या काळजावर वार करून गेला. नवीन जाती जाती घालून देवेंद्र फडणवीस यांनी गोरगरीब ओबीसींचं आरक्षण कमी केलं. जातवान ,खानदानी मराठे भाजपचा राजकीय एनकाउंटर करणार म्हणजे करणार”, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले. ते अंतरवाली सराटी येथे बोलत होते.
मनोज जरांगे म्हणाले, निवडणुकीबाबत अजून काही ठरलं नाही, ठरण्यासाठी आजची बैठक नव्हती. फक्त चर्चा झालीसखोल चर्चा झाली. समाज नावाचा आपला बाप ठरवणार आहे. पाडायचे की उभे करायचे, तो समाज 20 ला निर्णय होईल. मत जाऊन घेणं महत्वाचे होतं. सर्व जण बोलले , काही पाडा म्हणणारे बोलले काही, उभे करा म्हणणारे बोलले. जो निर्णय होईल तो समाजाच्या हिताचा निर्णय होईल. ही लाट आहे याला गर्दी म्हणू नका. हा आक्रोश आहे, इथे सुखात कोणीच नाही. ही लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम लावणार आहे. ज्या मनस्थितीमध्ये समाज जाण्यास तयार नव्हता, त्या मनस्थितीमध्ये जाण्यास देवेंद्र फडणीस यांनी भाग पाडलं आहे, असंही मनोज जरांगे म्हणाले.
धाराशिव-मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज आंतरवली सराटी येथे विधानसभेच्या उमेदवारी बाबत महाराष्ट्रातील मराठा बांधवाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला धाराशिव जिल्ह्यातून 65 ते 70 मराठा समन्वयकांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे विधानसभेची उमेदवारी मागितली आहे. महत्वाचे म्हणजे यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. शिवसेनेचे प्रवक्ते योगेश केदार ,राष्ट्रवादीचे. प्रदेश सरचिटणीस प्रतापसिंह पाटील, भूम परंडा वाशी मतदारसंघातील शिवसेनेचे प्रशांत चेडे यांनी ही मनोज जरांगे पाटील यांच्याकडे उमेदवारी मागीतली आहे.
छत्रपती संभाजी नगरचे माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड हे देखील आज अंतरवली सराटीमध्ये इच्छुक उमेदवारांच्या बैठकीमध्ये सहभागी झालेत. मनोज जरांगे यांनी आज सर्व इच्छुक उमेदवारांना अंतरवली सराटीमध्ये चर्चेसाठी बोलावलं होतं. त्यानिमित्ताने मधुकर राजे आर्दड हे दुपारी या ठिकाणी दाखल झाले. आपण जालन्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याचे सांगत मधुकर राजे अर्दाड या चर्चेत आपलं मत व्यक्त करणार आहेत.