मुंबई | मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार आहेत.दौरा यशस्वी करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली असून मराठा कार्यकर्त्यांच्या बैठकांना वेग आला आहे.राज्यातील विविध ठिकाणी ते भेटी देणार आहेत. 21 नोव्हेंबर रोजी ते ठाण्यात दाखल होणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाण्यात जरांगे येणार असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व आलं आहे. मुंबईत होणार सभा. पालघर जिल्ह्यातील वसई आणि बोईसर येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची जाहीर सभा घेण्याची तयारी सुरू असल्याचं कळतंय. वसई, बोईसरनंतर जरांगे यांची ठाणे आणि मुंबईत सभा घेण्याचा प्रयत्न असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे यांचे उपोषण सुरू असताना ठाण्यात त्याचे जोरदार पडसाद उमटले होते. या दरम्यान मराठा समाजाच्या आंदोलकांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी केल्याने वातावरणही तणावपूर्ण झालं होतं. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड