Manoj Jarange Aggressive : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मनोज जरांगे आक्रमक होत आता मतदान द्यायचे की नाही हे मराठे ठरवणार असल्याचा इशारा जरांगे यांनी सरकारला दिलाय…विधानसभा निवडणुकीत तुमचा सुपडा आम्ही साफ करू. तुमच्या 17 पिढ्या जरी आल्या तरी मराठ्यांना बाजूला ठेवून तुम्ही सत्तेत येऊ शकत नसल्याचंही जरांगे यांनी म्हटलंय… तर हरियाणासारखी मुसंडी महाराष्ट्रात चालणार नाही. महाऱाष्ट्रात मुसंडी फक्त मराठ्यांची चालणार असून महाराष्ट्रात तुम्हाला लोळवणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी फडणवीसांना दिला.
केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं. सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान एकाच टप्प्यात होणार आहे. 20 नोव्हेंबरला राज्यातल्या विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्या आधी 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत अर्जांची छाननी होणार आहे. तर 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं.