लातुर/प्रतिनिधी | विजय पाटील |
दि :२८/१०/२०२३
लातूर जिल्ह्यातील टाकळी ब सर्कल मधील मांजरापट्टयात मराठा आरक्षण आंदोलनाने जोर पकडला असुन दिनांक 27 ऑक्टोबर पासुन परिसरातील मराठा समाजाने नागझरी येथे साखळी उपोषण सुरू केले आहे तर आज दि 28 आक्टोंबर रोजी मांजरानदीपात्रात जलप्रवेश आंदोलन होनार आहे तेव्हा उध्या काय होईल याची तुफान चर्चा सर्वत्र सुरू आहे.
आज नागझरी गावामध्ये सकल मराठा समाज मांजरा पट्टा.. तसेच टाकळी, जेवळी, हरंगुळ खुर्द. वरवंटी. रायवाडी दर्जी बोरगाव. भोईसमुद्रगा. सांगवी.साई. यांच्यावतीने मराठा आरक्षण मिळेपर्यंत नागझरी गावांमध्ये साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. अंतरवाली सराटी ते महाराष्ट्रातील सर्व मराठा आरक्षण आंदोलक आमरण उपोषणासाठी बसली आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि सरसकट मराठा समाजाला पंन्नास टक्केच्या आत ओबीसी आरक्षण मीळावे या मागणीसाठी वरील सर्व गावातील समाज बांधव सामुहिकपणे आंदोलन करणार असुन आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे उमाकांत उफाडे यांनी पुजण करून आंदोलनाची रीतसर सुरूवात झाली यावेळी उपस्थित शेकडो आंदोलकांना संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक उमाकांत उफाडे.यांनी मार्गदर्शन करून मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठींबा दिला.नंतर परमेश्वर पवार नरेश पवार यांनी मार्गदर्शन केले यावेळी. श्रीराम साळुंखे.सुनिल पाटील. नागझरी निखिलेश पाटील जेवळी संतोष काळदाते . महादेव उबाळे. अशउल्लाखान.रघुनाथ घोडके इंद्रठना. श्रीराम महाडक. अशोक उफाडे. प्रताप उफाडे. भालचंद्र शिंदे. गजानन उफाडे.टाकळी. जाधव सांगवी यांच्या सहित शेकडो मराठा समाज बांधवांनी मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा शिवनिर्धार करून गरज पडली तर आंदोलन आणखी तिव्र करु शासनास जेरीस आणुन लढाई जिंकूच असा ठाम शिवनिर्धार सामुहिक शपथ घेऊन करण्यात आला. तसेच जलप्रवेश आंदोलनासाठी गाधवड. लातूर परिसरातील बांधवांनी हजारोच्या
संखेत उपस्थित रहावे असे अवहान संयोजकाच्या वतीने करण्यात आले.
सत्यप्रभा न्यूज