हिमायतनगर दि.१४: तालुक्यातील मौजे मंगरुळ येथे काँग्रेसचा जनसंवाद कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
हदगाव-हिमायतनगर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा. माधवरावजी पाटील साहेब यांनी वारंगटाकळी, खैरगाव, धानोरा,बोरगडी, सिबदरा आणि परिसरातील ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकुन घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. विविध विकास कामाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मंगरूळ व परिसरातील गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलासह गावातील रस्ते विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देणार असून या गावच्या विकासाला निधी कमी पडणार नाही. मंगरूळ च्या विकास कामासाठीच्या मागण्या लवकरच पुर्ण करून गावातील पाण्याचा प्रश्न, रस्ते, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, सभागृहासाठी दहा लाखाचा निधी देण्याची घोषणा केली आहे. याचबरोबर गावातील जुन्या पाईपलाईन ची दुरूस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देत काँग्रेस पक्ष जनेतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असुन जनतेने फक्त आवाज द्यावा, माझ्यासह काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल. असेही ते म्हणाले. मंगरूळ ग्रामस्थांनी आ. जवळगावकर साहेबांचे ढोल ताश्याच्या गजरात जंगी स्वागत केले.यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष गजानन सूर्यवंशी, माजी जि.प सदस्य सुभाषदादा राठोड, सभापती जनार्दन ताडेवाडा,शहराध्यक्ष संजय माने, सामाजिक कार्यकर्ते रफिक शेठ, गणेश शिंदे, सरपंच परमेश्वर गोपतवाड ,बाला पाटील, प्रथम नगराध्यक्ष अखिल भाई, नासर पठाण,योगेश चिलकावार,नितेश जैस्वाल,खालिदभाई,विकास गाडेकर करंजीकर, सुनील गुंडेकर, पांडुरंग गुंडेकर,अशोक अनगुलवार, सोपान बोंपीलवार आदींची उपस्थिती होती. तर ग्रामिण भागातील महिला,शेतकरी ,शेतमजुर,अपंग व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने हजर होता. या कार्यक्रमाचे आयोजन तालुकाध्यक्ष, श्री.संतोष आंबेकर,तालुका काँग्रेस कमिटी (अ.जा.) यांनी केले होते.
यावेळी तालुक्यातील शेकडो तरुणांनी काँग्रेस चे युवा नेते संतोष आंबेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन सन्माननीय आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
या कार्यक्रमासाठी मंगरुळचे सरपंच प्रतिनीधी बालाजी पावडे,सुभाष जललवाड,संदीप कुंजरवाड,शंकर गुंटेवाड,अविनाश धाबे,सुभाष गुलजरवाड,अविनाश मिराशे,रमेश सादलवाड,पोतन्ना आकेमवाड,शंकर धाबे,आनंदा पेंटेवाड,रमेश रुद्रबोईनवाड,प्रदिप पेरमेटवाड,आडेलू सातेगावकर,प्रकाश बोरकर,विकास बोरकर,प्रकाश गुलझरवाड,किशन गुरगुटवाड, बबन खंदारे यांनी परिश्रम घेतले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड