नांदेड दि.४: महाराष्ट्र आर. टी. ई.(शिक्षणाचा अधिकार )अंतर्गत इंग्रजी माध्यम व इत्तर शाळेमध्ये सहा ते चौदा वयोगटातील विदयार्थ्यांचे शिक्षण पहिली ते आठवी पर्यंत मोफत असून ते दहावी पर्यंत करण्यात यावे अशी मागणी मंगेश कदम यांनी केली असून गोरगरीब, गरजू लोकांचे पाल्य आठवी पर्यंत मोफत शिक्षण घेतात परंतु पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांना मोठी आर्थिक झळ पोहचत आहे. कांही गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही त्यामुळे
आर टी. ई.अंतर्गत असलेले आठवी पर्यंतचे मोफत शिक्षण वाढवून दहावी पर्यंत करा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कडे केली असून या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव बालाजीराव खतगावकर यांच्याकडे शिवसेना एस.सी.एस. टी. ओबीसी विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम यांनी केली.
याप्रसंगी बिलोली शिवसेना तालुकाप्रमुख बाबाराव रोकडे पाटील, महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख सविताताई चपलवार, बिलोलीचे माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे शिवाजीराव हेळगुडे,ओबीसी विभागाचे तालुका प्रमुख अमोल स्वामी लोणीकर, शिवसेना संघटक धनाजी जोशी,संदीप देशमुख गोजेगावकर,नागेश जोशी करडखेडकर यांच्यासह देगलूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बालाजीराव खतगावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यामार्फत हि मागणी पूर्ण करू असे आश्वासन मंगेश कदम यांच्यासह शिष्टमंडळास दिले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड