How Shivraj Singh Chauhan Become Gamechanger In MP : मध्य प्रदेशात भाजपनं काँग्रेसचा धुव्वा उडवत एकहाती सत्ता मिळवली आहे. मतमोजणीपूर्वी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मध्य प्रदेशात भाजप पराभूत होईल असे अंदाज वर्तवण्यात आले होते. मात्र, येथील मतदारांनी भाजपच्या विकसीनशील राजकारणाला पाठिंबा देत झोळीत घवघवीत यश टाकले आहे. या सर्व विजयामध्ये मामांजी म्हणजेच शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) बाजीगर ठरल्याचे चित्र आहे. आलेल्या अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी हार न मानता भाजपचा हा गड जिंकला आहे.
Assembly Election 2023 : केसीआरची ऑफर नाकारली; काँग्रेसला जिंकून देण्यामागे डोकं कुणाचं ?
निवडणुकांपूर्वी भाजपनं केलं होतं साईड लाईन
मध्य प्रदेशातील निवडणुकांपूर्वी स्वतःच्याच पक्षाकडून शिवराजसिंह यांना साईड लाईन करण्यात आले होते. उमेदवारी जाहीर करताना पहिल्या दोन याद्यांमध्ये पक्षाकडून चौहान यांना डावलण्यात आले होते.
साईड लाईन होऊनही मानली नाही हार
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 2023 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला पुन्हा एकदा मोठा विजय मिळवून दिला आहे. या निवडणुकीत भाजपने 230 पैकी 163 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसने 66 जागा जिंकल्या आहेत. या मोठ्या विजयामध्ये मतदारांमध्ये चौहान यांची क्रेझ कायम असल्याचे अधोरेखित झाले आहे. कारण, पहिल्या दोन याद्यांमध्ये भाजपकडून त्यांचा नावाचा विचार करण्यात आला नव्हता. मात्र, याकडे चौहान यांनी अधिक लक्ष न देता खचून न जाता काम करण्यावर भर दिला आणि त्यांनी बुधनी मतदारसंघातून 1 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला.
Telangana Election : तेलंगणात विद्यमान अन् भावी मुख्यमंत्र्यांना पराभूत करणारा जायंट किलर कोण?
सभा अन् भेटीगाठी ठरल्या विजयाचे कारण
पक्षाकडून साईड लाईन करण्याचा प्रयत्न चौहान यांच्यासोबत करण्यात आला. मात्र, या कठीण परिस्थितीत चौहान यांनी अंतगर्त वादावर अधिक भाष्य करत बसण्यापेक्षा अथक परिश्रम केले. एकटे शिवराज दिवसभरात 10 हून अधिक सभा घेत होते, तर त्यांचे विरोधक कमलनाथ केवळ एक ते दोनच सभा घेऊन परतत होते.
लाडली योजना ठरली गेमचेंजर
मामांजी नावाने मतदारांमध्ये शिवराजसिंह चौहान मतदारांमध्ये अतिशय लोकप्रिय मानले जातात. त्यांच्या कार्यकाळात चौहान यांनी राज्यातील महिलांसाठी लाडली बेहना योजना सुरू केली. ही योजना महिलावर्गात अल्पावधित लोकप्रिय झाली आणि निवडणुकांमध्ये चौहान यांच्या विजयात गेमचेंजर ठरली.
‘और कहो पनौती…’, ‘राजकारणातील पनौती पप्पू’; तीन राज्याच्या निकालावरून मजेशीर मिम्स
वरील योजनेशिवाय चौहान यांच्या विजयामागे अन्य कारणेदेखील आहेत यात प्राममुख्याने त्यांनी प्रचारादरम्यान सरकारची भूमिका आणि केलेली कामगिरी अतिशय प्रभावीपणे मांडली. यामुळे मतदारांमध्ये पक्ष आणि शिवराजसिंह चौहान यांची प्रतिमा चांगली तयार होण्यास कारणीभूत ठरली.
या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजे 1 जानेवारीपासून प्रचारसंपेपर्यंत म्हणजे 15 नोव्हेंबरपर्यंत चौहान यांनी सुमारे 1,000 कार्यक्रमांना संबोधित केले. तसेच राज्यभरात 165 रॅलींमध्येदेखील सहभाग नोंदवला.
संबंधित बातम्या
वेब स्टोरीज