नांदेड दि.११: लाल कंधारी हे नांदेड जिल्ह्याचे वैभव असून त्याचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करु असे प्रतिपादन आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अश्व व विविध पशु प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, तहसीलदार लाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुक्कावार, डॉ प्रविण घुले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बोधनकर, नायब तहसीलदार मोकले, शाम पवार, पुंडलिकराव बोरगावकर, डॉ. पुरी, डॉ. केंद्रे, राम पाटील, चंद्रशेखर पाटील, रोहित शिंदे आदींची उपस्थिती होती.
यात्रेत विविध जातीचे श्वान
माळेगाव यात्रेत पशु प्रदर्शनात विविध कुंत्र्यांच्या जातीमध्ये राँट, ब्रिलर, लाँबर डॉग आदी कुत्र्यांच्या जातींनी हजेरी लावली.
येथे 60 हजाराचा श्वान विक्रीसाठी होता. छोट्या पिलांची श्वान जोडीचा 25 हजारावर भाव होता. पॅरोटविक कोंबडा 9 हजार रुपये, 11 लाखाची देवणी जातीच्या गाय पाहवयास मिळाली. येथे विविध पशूमध्ये घोडे, गाढव, उंट, कोंबडे तसेच विविध जातीचे कुत्रे पहावयास मिळाले.
विविध जातींचे अश्व
घोडे बाजार हे माळेगाव यात्रेचे आकार्षण आहे. येथे विविध जातीचे अश्व दाखल झाले आहेत.
यात्रेत यावेळी सिंध, काठेवाड, धारवाड, पंजाब, नुकरा, स्टँलिकन, बाँडा, हुलकारी, पंचकल्याण आदी जातीचे अश्व दाखल आहेत. यावेळी अश्वांच्या विविव कवायती प्रेक्षकांना दाखविल्या.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड