किनवट प्रतिनिधी दि.२: आज दिनांक ०२ रोजी पंचायत समिती किनवट कार्यालयात गटविकास अधिकारी यांच्या दालनात पिंपळे एस.आर. ग्रामसेवक ग्रा.पं. कार्यालय निराळा ग्रा.पं. चे माजी उपसरपंच श्री. प्रदीप नंदकिशोर महल्ले यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेल्या कामाची देयक आदा करण्यासाठी आज दिनांक 1.30 च्या सुमारास ग्रा. पं. निराळा येथील आजी सरपंच श्री. दिलीप माधव कनाके, माजी उपसरपंच श्री. प्रदीप नंद किशोर महल्ले यांच्या मागील बिलाच्या देयकाबाबत चर्चा करत असतांना साहेबांनी माजी उपसरपंच यांना तुम्ही सर्व कागदपत्र पुर्ण करुन दया मँडम बिल देतात, असे समाजवुन सांगत असतांनाच माजी उपसरपंच यांनी आरेरावीची भाषा वापरली असता आरेराविच्या भाषेत बोलु नका म्हणुन ग्रामसेवक पिंपळे हे सांगत आसतानाच महल्ले यांनी रागात येवुन गट विकास अधिकारी यांच्या समक्ष लोखंडी खुची अंगावर फेकली त्या अचानक बाजुला झाल्यामुळे बालबाल बचावल्या हयावेळी मा. गट विकास अधिकारी यांच्या दालनात हजर असलेले मा. श्री. पीज. वैष्णव ग. वि. अधिकारी,रमेश बद्देवाड , सरपंच दिलीप कनाके, श्री. झटकावडे , सुनिल जाधव ( ग्रामसेवक) यांनी सोडवायचा प्रयत्न केला.
तरी मागील बिलाच्या कारणावरुन माजी उपसरपंच श्री. प्रदीप नंदकिशोर महल्ले यांनी ग्राम सेवक पिंपळे यांना रागाच्या भरात लोखंडी खुर्ची अंगावर फेकुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी ही या करिता मा. पोलिस उपनिरीक्षक यांना फिर्यादी अर्ज केला या प्रकरणी महल्ले यांच्यावर शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी भारतीय दंड संहिता १८६० नुसार ३५३ व३३६ कलम नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास किनवट पोलिस उपनिरीक्षक हे करीत आहेत.
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड