हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- हदगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ हिमायतनगर येथील भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी बोलताना तालुका अध्यक्ष गजानन चायल यांनी हिमायतनगर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपले बूथ हे मजबूत असले पाहिजे माझं बूथ, सर्वात मजबूत हे अभियान अधिक व्यापक करून महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी काम करावे असे सांगितले
या बाबत सविस्तर वृत्त असे की सध्या महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी महायुतीचे सरकार स्थापन आहे त्यामुळे हदगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केलेल्या विकासाचा लेखाजोखा प्रत्येक गावातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून हिमायतनगर मतदारसंघात महायुती सरकारने केलेली असंख्य विकास कामे मतदारांना सांगून सर्व मतदार राजांना व माता-भगिनींना लाडके बहीण योजनेतून मिळालेला लाभ व अपंगांना देण्यात आलेले साहित्य , प्रधानमंत्री आवास योजना अशा विविध लोक कल्याणकारी योजनांची माहिती देऊन महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांनी मागील काही दिवसांपासून हिमायतनगर तालुक्यातील काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या गावात भारतीय जनता पार्टी मध्ये असंख्य नागरिकांचा पक्षप्रवेश घेऊन तेथील काँग्रेसला खिंडार पाडून मोजे काळुवाडी तांडा, दाबदरी, कोठा वाडी, रमनवाडी, खडकी सह आदी गावातील असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश घेऊन हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा विडा त्यांनी उचललेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सर्व बूथ प्रमुखा सह सर्व कार्यकर्त्यांनी आपले बूथ,सर्वात मजबूत करण्यासाठी आगामी काही दिवसांत अथक परिश्रम घ्यावे अशी विनंती भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले आहे