तुषार कांबळे | हदगाव प्रतिनिधी | हदगाव तालुक्यातील मौजे लिंगापूर येथे होणार एक मे महाराष्ट्र दिनाचे अवचित्य साधून येथे अनेक शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधव यांचा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल होणार मान्यवराच्या हस्ते सन्मान होणार आहे. यामध्ये शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रसिध्द गायक शिवशाहीर बाळराज काळबांडे यांच्या मधुर आवाजात प्रबोधन पर कार्यक्रम होणार असून यावेळी कार्यक्रमांचे उ्घाटन आ. बाबूराव कदम कोहळीकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असून मा. खासदार सुभाषराव वानखेडे हे प्रमुख पाहुणे तर मा. खा हेमंत पाटील , शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विवेक देशमुख, जि. प. सदस्य रमेश घंटलवार, तहसीलदार सुरेखा नांदे , उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे ,
तालुका कृषी अधिकारी सदानंद पाटील , बिडीओ कैलाश बळवंत, महाराष्ट्र राज्य स्वराज्य पक्ष उपध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांची व भाजपाचे हदगाव तालुका अध्यक्ष आष्टी गटाचे भागवतराव पाटीर् देवसरकर हे प्रमुख उपस्थिती असून युवा सेना सरचिटणीस हदगाव या मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार असुन कार्यक्रमांचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते अभिजीत पाटील देवसरकर यांनी केले.