मुंबई दि.२५ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा करत आहोत. वंचित बहुजन आघाडी राज्यातील महत्वाचा घटक असून दिनांक 25 जानेवारी रोजी होणाऱ्या चर्चेत वंचित आघाडीने सहभागी व्हावे अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे, असे या पत्रात म्हटले आहे.