नांदेड मुदखेड ता.प्रतिनिधी दि.२६: मुस्लिम धर्मात एकूण पाच धार्मिक तत्वे मूलभूत असून त्यांना करणे अनिवार्य असून त्यात कलमा (तोहीद) , (नमाज) प्रार्थना, (रोजा) उपवास,(जकात) कर देणे, आणि पवित्र हज यात्रा धार्मिक अश्या धार्मिक तत्वांवर मुस्लिम अनुयायी जगात काटेकोरपणे पालन करतात.
मुदखेड शहरातील मिल्लत नगर येथील रहिवाशी तथा साप्ताहिक मुदखेड दर्पण चे कार्यकारी संपादक शेख इमाम शेख फरीद यांची 09 वर्षाची नात मदिहा अफशीन शेख जावेद ने दिनांक 23 मार्च रोजी चालू असलेल्या पवित्र रमझान महिन्यातील 30 रोजा पैकी एक रोजा ठेऊन रोजा कसे, काय असतात याचा अनुभव घेतला , तिच्या ठेवलेल्या रोजा उपवासासाठी माजी उपाध्यक्ष करीम खाँ साब,पत्रकार अतीक अहेमद,माजी नगरसेवक प्रतिनिधी अब्दुल सलाम सर,माजी नगर सेवक प्रतिनिधी गौस नबिसाब,मुजीब पठाण,माजी नगर सेवक प्रतिनिधी बबलू सेठ,
तिचे मोठे बाबा शेख जावेद शेख इमाम,तिचे वडील शेख जावेद शेख इमाम,शेख मुजाहेद, हाजी शेख नाहेद,साप्ताहिक मुदखेड दर्पण चे संपादक शेख इरफान शेख इमाम, मोईन भाई फुलारी, मस्तान टेलर,आदींनी तिचं कौतुक करत अभिनंदन केलं तिच्या ठेवलेल्या रोजामुळे इतर सुद्धा समाजात रोजा ठेवण्यासाठी प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड