नांदेड: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या तारखा शनिवारी (दि.१६ मार्च) जाहीर झाल्या आहेत. सात टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीला १९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. निवडणुकीत मतदान करण्यासाठी तुमचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. या निवडणुकीपासून नवीन नाव नोंदणी केलेल्या मतदारांची यादी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.
अंतिम मतदार यादी पाहण्यासाठी निर्वाचन आयोगाने तयार केलेल्या मतदाता सेवा पोर्टलच्या https://bit.ly/3IFcJno या लिंकवर क्लिक करा.
जुन्या यादीत नाव तपासण्यासाठी तुम्हाला पुढील मतदाता सेवा पोर्टलच्या खालील संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल… https://voters.eci.gov.in
निवडणूक आयोगाच्या वरील दोन संकेतस्थळावर तुमचे नाव तपासून खात्री करून घ्या. मतदार यादीत अगोदरच नाव तपासून घेतल्यामुळे मतदानाच्या दिवशी तुमची गडबड होणार नाही.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड