नांदेड दि.१८: स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांनी दिनांक 17/12/2023 रोजी 23.00 वाजता सपोनि वाहुळे, सपोनि माने, पोउपनि काळे, पोउपनि सोनवणे, यांचे टिमला नांदेड शहरात रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेकींग व अग्निशस्त्रा संबधाने दाखल गुन्हयातील रेकॉर्ड वरील आरोपी चेकींग करुन कारवाई करण्याचे आदेश देवुन रवाना केले होते.
श्री पांडुरंग माने सपोनि स्थागुशा यांचे टिम रेकॉर्डवरील आरोपीस व अग्निशस्त्र संबधाने दाखल रेकॉर्ड वरील आरोपीस चेक करीत असतांना सपोनि पांडुरंग माने यांना माहीती मिळाले की मौजे वाजेगाव येथील दशरथ भद्रे रा. पंचशीलनगर वाजेगाव याचेकडे एक पिस्टल आहे तो नेहमी वापरत असतो असी खात्रीशीर माहीती मिळाले वरुन त्यांनी त्यांचे सोबतचे अमलदार व पंचासह पंचशील नगर वाजेगाव येथील इसमाचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन त्यांची नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव दशरथ हरी भद्रे वय 33 वर्षे व्यवसाय ड्रायव्हर रा. पंचशीलनगर वाजेगाव ता.जि. नांदेड असे सांगीतले त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता याचे कमरेला एक अग्निशस्त्र (गावठी कट्टा) व दोन जिवंत काडतुस किमती 32,000/- रुपयाचे अग्निशस्त्र मिळुन आले सदर आरोपी विरुध्द सपोनि श्री पांडुरंग माने यांनी पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथे फिर्याद दिली आहे.
सदरची कार्यवाही ही मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थागुशा, सपोनि पांडुरंग माने, पोउपनि / दत्तात्रय काळे, आशीष बोराटे, सचीन सोनवणे, पोलीस अमलदार गंगाधर कदम, तानाजी येळगे, मोतीराम पवार, विलास कदम, मारोती मोरे, रनंधीर राजबन्शी, गजानन बयनवाड, विठ्ठल शेळके, चालक पोकॉ/गंगाधर घुगे यांनी पार पाडली असून सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतूक केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड