हिमायतनगर प्रतिनिधी/- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या औचित्य साधून दिनांक सात जानेवारी रोजी हिमायतनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे हादगाव हिमायतनगर तालुक्यातील लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस तालुका व शहर शाखे कडून हिमायतनगर येथील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला….
या बाबत सविस्तर वृत्त असे की दर्पण दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवाचा हदगाव/हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे सामाजिक कार्यकर्ते शेख रफिक शेख महेबूब यांच्यातर्फे सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान म्हणून त्यांना एक पेन व गिफ्ट देऊन सर्व पत्रकार बांधवांचा स्तकार करण्यात आला यावेळी शहराच्या ग्रामीण भागातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफिक भाई यांनी उपस्थित पत्रकार बांधवांना असे सांगितले की आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याशी चर्चा करून तालुक्यातील पत्रकार बांधवांना बैठकीसाठी पत्रकार भवन उभारून देऊ व आगामी काळात हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे बांधकामातील एक गाळा पत्रकार भवनासाठी देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांच्याकडून देण्यात आल्याचे सांगितले व त्या पत्रकार भावनांमध्ये लागणारे फर्निचर मी स्वतः बनवून देण्याचे आश्वासन सुद्धा शेख रफिक भाई यांनी उपस्थित पत्रकार बांधवांना दिले
यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष गजानन सूर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्दन ताडेवाड,काँग्रेस शहर अध्यक्ष संजय माने,योगेश चिल्कावार,प्रवीण कोमावार, पंडीत ढोणे,ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड,प्रकाश जैन, कानबा पोपलवार,वसंत राठोड,अनिल मादसवार,दिलीप शिंदे,अनिल भोरे, पांडुरंग गाडगे,असद असंच मौलाना नागेश शिंदे मनोज पाटील सोपान बोंबीलवार धोंडोपंत बनसोडे विजय वाठोरे सिद्ध हनवते अनिल नाईक अंगद सुरोशे, नागोराव शिंदे , चांदराव वानखेडे,धम्मा मुंनेशवर, सह असंख्य पत्रकार बांधव संपादक व सोशल मीडियाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…