विजय पाटील
लातूर दि.३०:
शहरातील बार्शी रोड परिसरामध्ये एक महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरून स्त्रियांना बोलावून घेऊन डायमंड स्पा च्या नावा खाली त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेत आहे. सदर माहितीची खातरजमा केल्यानंतर सदरची बाब खरी असल्याचे निदर्शनास येताच दिनांक 27/11/2024 रोजी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्रीमती बबिता वाकडकर यांच्या नेतृत्वात एएचटीयु पथकाने बनावट ग्राहक पाठवून मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळून ती खरी असल्याचे निदर्शनास येताच लातूर शहरातील बार्शी रोड परिसरातील “डायमंड स्पा” वर छापा मारला त्याठिकाणी देहविक्री करीत असताना दोन पिडीत महिला व वेश्या व्यवसाय करून घेणारे एक महिला आढळून आले. तसेच पिडीत महिलांकडून देहविक्रय व्यवसाय करून घेणारे, स्वतःच्या फायद्यासाठी बाहेर गावाच्या महिलांना स्वतःचे स्पा मध्ये ठेवून त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून स्पा च्या नावाखाली वेश्या व्यवसाय करून घेतात व आम्हाला काही रक्कम देऊन आमची राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करतात असे पीडित महिलांनी सांगितले.
सदर प्रकारा बाबत पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा रजिस्टर नंबर 840/2024 कलम 147 भारतीय न्याय संहिता व 3, 4, 5, अनैतिक व्यवसाय प्रतिबंध अधिनियम 1956 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून कुंटणखाना चालणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईत पोलीस निरीक्षक श्रीमती बबिता वाकडकर, पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख, सुभाष सूर्यवंशी, पोह. सदानंद योगी, प्रकाश जाधव, महिला पोह. सुधामती यादव आणि निहाल मनियार यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे एमआयडीसी चे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे करीत आहेत.
#सत्यप्रभा न्यूज # लातूर