हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- शहरातील ज्येष्ठ नागरिक तथा एक धुरंदर निस्वार्थ राजकारणी आज दिनांक 22 जून दुपारी तीन वाजून 35 मिनिटाला काळाच्या पडद्याआड गेल्याची दुःखद बातमी हिमायतनगर तालुक्याला कळताच हिमायतनगर तालुक्यासह जिल्ह्यात शोककळा पसरली
या बाबत सविस्तर वृत्त असे की स्वर्गीय लक्ष्मण शक्करगे म्हणजे हिमायतनगर तालुक्यासह जिल्ह्याला परिचित असणारे एक चालतं बोलत व्यासपीठ शक्करगे साहेबांची राजकीय कारकीर्द पाहायचे झाल्यास स्वर्गीय लक्ष्मण शक्करगे यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1938 रोजी एका गरीब शेतकरी कुटुंबामध्ये झाला त्यांना लहानपणापासूनच मित्र परिवारामध्ये गोडी असल्यामुळे त्यांना चळवळीचे नेतृत्व करण्याची आवड होती त्यामुळे त्यांनी त्यांच्या पुढील प्रवासामध्ये हिमायतनगर शहराच्या राजकारणात प्रवेश करून हिमायतनगर शहरातच्या सरपंच पदावर जाण्याचा बहुमान त्यांनी इसवी सन 18 मार्च 1968 रोजी मिळविला या सरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांनी उत्कृष्ट असे काम केल्यामुळे सलग पंधरा वर्षे त्यांनी हिमायतनगर शहराच्या सरपंच पदाची धुरा सांभाळली त्यानंतर त्यांनी हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, नांदेड जिल्हा जिल्हा परिषदेचे सदस्य त्यानंतर हुतात्मा जयंतराव पाटील साखर कारखान्याचे माजी संचालक व शहराचे ग्रामदैवत श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे संचालक अशा उच्च पदावर त्यांनी नेतृत्व केले त्यानंतर त्यांनी हदगाव हिमायतनगर विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली त्या निवडणुकीमध्ये अल्प मताने त्यांचा पराभव झाला त्यामुळे ते तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात परीचीत झाले तेव्हापासून त्यांनी लोकांची कामे करण्याची आस उराशी बाळगून काम केले त्यामुळे निस्वार्थ व्यक्तिमत्व म्हणून ते जिल्ह्याला परिचित झाले होते त्यांच्या निधनामुळे हिमायतनगर तालुक्यासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे स्वर्गीय लक्ष्मण शक्करगे यांच्यावर उद्या दिनांक 22 जून रोज रविवारी दुपारी अंत्यविधी होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली स्वर्गीय लक्ष्मण शक्करगे यांच्या पश्चात तीन मुले ,दोन मुली, नातू पंतू असा मोठा परिवार आहे…..