विजय पाटील
लातूर दि.२८:प्रदीर्घ संघर्षानंतर लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात नवे परिवर्तन घडून आले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची स्वप्नपूर्ती झाली. या मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार रमेशआप्पा कराड यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी गावा गावातील वाडी वस्तीतील भाजपा कार्यकर्त्यांसह मतदारांनी आ. कराड यांच्या संवाद कार्यालयावर दिवसभर प्रचंड मोठी गर्दी केली.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून गेल्या पंधरा वर्षात काँग्रेसचे आमदार निवडून आले. मांजरा परिवारातील साखर कारखान्यांचे जाळे मजबुत असल्याने हा मतदारसंघ देशमुखांच्या नेतृत्वातील काँग्रेसचा बालेकिल्ला असे समजण्यात येत होते. या मतदार संघातील तीन वेळेस झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या कोणत्याही आमदाराला दुसऱ्यांदा संधी मिळाली नाही हे विशेष. लातूर ग्रामीण मतदार संघातील गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या शेतकरी शेतमजुराच्या हितासाठी न्याय हक्कासाठी सतत भाजपा नेते रमेशआप्पा कराड आंदोलने केली, मोर्चे काढले देशमुखांची एकाधिकारशाही, हुकुमशाही नष्ट करण्यासाठी संघर्ष केला या लढ्यात गरीब सामान्य कुटुंबातील कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी झाले त्यांनी प्रत्येक वेळी साथ दिली. मागील दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करूनही कधीच खचून न जाता सातत्याने सर्व सामान्याचे हितासाठी कार्यरत राहिल्याने आ. रमेशआप्पा कराड यांच्यावर जनतेचा विश्वास मजबूत झाला आणि त्यातूनच महायुतीचा विजय होऊ शकला. रमेशआप्पा जनतेच्या मतातून निवडून यावेत त्यांनी विधानसभा सभागृहात काम करावे ही सर्वसामान्यांची अनेक वर्षांची इच्छा या निवडणुकीत पूर्ण झाली. मीच विजयी होणार माझे आप्पा आमदार होणार या भावनेतून प्रत्येक जण मोठ्या जिद्दीने निवडणुकीच्या काळात कार्यकर्ता काम करत होता.
गेल्या पाच वर्षात काँग्रेसच्या आमदार महोदयांनी जनतेला दिलेली कुठलीच आश्वासने पूर्ण केली नाहीत. कुठल्या गावाला कोणती योजना आणली, काय काम केले हेही सांगू शकले नाहीत. एवढेच काय तर जनतेला भेटत नाहीत. कुणाच्या अडीअडचणी सोडवत नाहीत हेच कारण काँग्रेसला पराभवाकडे घेऊन गेले. उलट रमेशआप्पांचे काम पाहून पक्षश्रेष्टीने त्यांना आमदार म्हणून विधान परिषदेवर काम करण्याची संधी दिली मिळालेल्या संधीच्या माध्यमातून गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे आणि ग्रामीण भागातील गावागावात वाडी वस्ती वीज, विकास कामांना कोट्यावधीचा निधी मिळून दिला. मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवलं.
भाजपाचे नेते रमेशआप्पा कराड लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून यावेत यासाठी वर्षानुवर्ष संघर्ष आणि प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मेहनतीला यश आले आहे निवडणुकीचा निकाल जाहीर होताच मतदार संघातील प्रत्येक गावागावात वाडी वस्तीत कार्यकर्त्यांसह मतदारांनी मोठा आनंद उत्सव साजरा केला. आपले आप्पा आमदार झाले ही भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. नवनिर्वाचित आमदार रमेशआप्पा कराड हे निवडणूक निकालानंतर मुंबईला जाऊन आले. त्यानंतर काल आणि आज भाजपाच्या संवाद कार्यालयात हितचिंतकाबरोबरच भाजपासह महायुतीतील कार्यकर्त्यांनी मतदार बंधू-भगिनींनी आप्पांचा यथोचित सत्कार करून पेढे भरवून प्रत्येक जण त्यांचे अभिनंदन करीत होते. दिवसभर अभिनंदन करणाऱ्यांची आणि शुभेच्छा देणाऱ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. आपल्या हक्काचा माणूस आमदार झाल्याची भावना प्रत्येकातून व्यक्त केली जात होती. यावेळी नवनिर्वाचित आमदार रमेशआप्पा कराड यांना आमच्या गावी या आम्हाला वेळ द्या सत्कार करायचा आहे असे अनेकजण बोलून दाखवत होते. येणाऱ्या काळात मतदार बंधू भगिनींचे माझ्या लाडक्या बहिणीचे आभार व्यक्त करण्यासाठी मतदार संघातील प्रत्येक गावागावात येणार आहे असे त्यांनी बोलून दाखविले.
#सत्यप्रभा न्यूज # लातूर