नांदेड दि.२७: कंधार तालुक्यातील बिजेवाडी (खेमा नाईक तांडा) येथील जेष्ठ नागरिक तथा सेवादास महाराज भटक्या विमुक्त जाती मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन लालू खेमा जाधव वय (९५) यांचे २७ ऑक्टोबर रोजी नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाला आहे. त्यांचा अत्यंविधी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता त्याच्या राहत्या गावी बिजेवाडी खेमा तांडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात ५ मुले, २ मुली, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. ते माजी पीएसआय विठ्ठल जाधव, शिवशक्ती संस्थेचे सहसचिव भगवान जाधव, अहमदपूर येथे एएसआय असलेले शिवाजी जाधव, नांदेड पोलिस मुख्यालयात एएसआय पदावर असलेले पंढरी जाधव व मार्केट कमिटी कंधार येथील माजी संचालक श्रीराम जाधव यांचे ते वडिल होते. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड