छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी विजय पाटील दि २० :
कन्नड तालुक्यात लग्नानंतर अवघ्या तीनच दिवसांत नवरी घरातून निघून गेल्याची तक्रार पतीने कन्नड शहर पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी हरवल्याची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे. कन्नड शहरातील शिवशंकर कॉलनी, साई मंदिराच्या बाजूला, हिवरखेडा रोड येथे हा प्रकार घडला.
पती संदीप जगन्नाथ येवले यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. संदीप कामानिमित्त घराबाहेर गेले असताना घरून वहिनीचा कॉल आला. त्यांनी सांगितले, की तुमची पत्नी वर्षा दुपारी बाराला घरातून कुणाला काही न सांगता निघून गेली आहे… हे एेकून घाबरून गेलेल्या संदीप यांनी घर गाठले. त्यानंतर परिसरात, नातेवाइकांकडे शोध घेतला. मात्र पत्नी वर्षा मिळून आली नाही. अखेर पोलिसांत तक्रार करण्यात आली. याविषयी कुणाला माहिती असल्यास कन्नड शहर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
# सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर