विजय पाटील
लातूर दि.२२:
लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात असून काहि दिवसांपुर्वी उदगिर मधील दाखल प्रकरणामुळे अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची प्रतिमा डागाळल्या मुळे आता नेमका पर्याय काय..?असा विचार चालू असताना
ता. जळकोट जि.लातूर येथील रहिवासी असलेले माजी उपनगराध्यक्ष,माजी नगराध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, लातूर ,प्रदेश सदस्य किसान मोर्चा, भारतीय अन्न महामंडळ सदस्य या पदावर कार्य केले असून सध्या मराठवाडा संयोजक भाजपा पंचायत राज व ग्रामविकास व संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जळकोट या पदावर कार्य करणारे आणि या कार्यासाठी शिक्षक पदाची सरकारी नौकरी सोडून (स्वेच्छानिवृत्ती) घेऊन पक्ष कार्य करणारे धुळशेट्टे किशन माधव यांनी लातूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून केंद्रीय रस्ते विकास मंत्री मा नितिन गडकरी,विनोदजी तावड़े,राष्ट्रीय महासचिव,भाजपा, चंद्रशेखर बावनकुळे , प्रदेशाध्यक्ष देवेन्द्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे उमेदवारी साठी मागणी करुन भुपेंद्रजी यादव,निवडणूक प्रभारी यांची भेट घेतली.विशेष म्हणजे
धुळशेट्टे किशन माधव यांचा समाजिक कामाचा संपूर्ण जिल्हाभर गौरव झाला असून पार्टीचा धडाडीचा, विश्वासु कार्यकार्ता म्हणुन त्यांची ओळख आहे.लोकसभा व विधानसभा मतदार संघात पक्ष बांधनी व पक्ष वाढीसाठी कुशल संघटक म्हणून कारत असताना जिल्हयात एकही स्वराज्य संस्था तांब्यात नसताना सर्व प्रथम जळकोट नगर पंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकावला,. जून २०१४ मध्ये औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून विधान परिषेदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी भाजपाचे महाष्ट्राचे माजी प्रदेश अध्यक्ष तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पुढील काळात तुमचा विचार करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.त्यामुळे त्यांनी उमेदवारी माघार घेऊन पक्षाच्या आदेशाचे पालन केले. व तसेच सन मे २०१८ मध्ये धराशिव तथा लातूर, बीड स्थानिक प्राधिकारी मतदार संघातून (विधान परिषेदेसाठी) उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी ही पक्षाच्या वरिष्ट नेत्यांनी उमेदवारी मागे घेण्यास सांगितले व पुढे संधी देण्याचे आश्वासन दिले त्यामुळे उमेदवारी माघार घेऊन पक्षाच्या आदेशाचे पालन केल्याने आता मला नक्की संधी मिळेल असे वाटत आहे.
लातूर जिल्यात लिंगायत समाजाची मतदार संख्या ही दुसऱ्या क्रमांकर असून जिल्ह्यातील सहा मतदार संघापैकी एक लातूर शहर विधान सभेची उमेदवारी ही लिंगायत समाजास दिल्यास त्याचा जिल्हात पक्षाला निवडणूकीत फायदा होणार आहे.लिंगायत समाजतीला उमेदवाराला या निवडणुकित मराठवाड्यात अजून पर्यंत स्थान मिळाले नाही आणि आता लातूर शहराला लिंगायत समाजातीलचं उमेदवार मिळावा अशी मागणी होत आहे.एकिकडे भाजपा मध्ये एकनिष्ठ आणि बाहेरिल उमेदवार अशी रस्सी खेच चालू असताना अता लिंगायत समाजतूनचं उमेदवारी मिळावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.या समाजाकडे निर्णायक मतदार म्हणुन सातत्याने पाहिले जाते तसेच या समाजासोबत मराठा आणि मुस्लिम समाज ही महत्वाचा दुवा ठरतो परंतू सध्या जरांगे पाटलांनी केलेल्या भाजप विरोधी वक्तव्या मुळे भाजप समोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.त्यामळेचं लातूर विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाजाला महत्व प्राप्त झाले आहे.
पक्षाचा प्रामणिक कार्यकर्ता म्हणून पक्षनेतृत्वाकडे उमेदवारची मागणी धुळशेट्टी यांनी केली आहे तसेच लातूर मधून माझ्या सारखा निस्वार्थ लिंगायत उमेदवार दिल्यास पक्षाला याचा फायदा होणार असून सर्व तागदीनिशी लढण्यास समर्थ असल्याचे मत ही त्यांनी व्यक्त केले आहे.
#सत्यप्रभा न्यूज # लातूर