नांदेड दि.३ मागील गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.
दिनांक २ ऑगस्ट रोजी स्थागूशा चे पोउपनि/मिलिंद सोनकांबळे यांचे पथकास गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, रेल्वेस्टेशन परीसरात पोलीस ठाणे उस्मानपुरा औरंगाबाद शहर हद्यीतील खुनाच्या गुन्हयात शिक्षा झालेला व पॅरोल रजेवर येवुन परत कारागृहात न जाता पळुन गेलेला आरोपी नामे दिनेश अर्जुनसिंह ठाकुर हा रेल्वेस्टेशन, नांदेड येथे आहे अशी माहीती मिळाल्याने स्थागुशाचे पथकाने रेल्वेस्टेशन परीसरातुन फरार आरोपी नामे दिनेश अर्जुनसिंह ठाकुर वय २९ वर्ष रा. जवळा मुराद ता. मुदखेड जि. नांदेड यास ताब्यात घेवुन पोलीस ठाणे बारड गुरनं. ६७/२०२३ कलम २२४ भा. द. वि. गुन्हयात पुढील तपासकामी देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, पोउपनि / मिलींद सोनकांबळे, सपोउपनि/माधव केंद्रे, पोहेकॉ/रुपेश दासरवार, पोकॉ/बालाजी यादगीरवाड, ज्वालासिंघ बावरी, मारोती मोरे, चालक हनुमानसिंह ठाकुर, शेख कलीम स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड