नांदेड दि.१०: काल दिनांक ८.१.२०२४.रोजी सहाय्यक पोलीस अधिक्षक किरतीका सी.एम. उप विभाग नांदेड शहर यांना माहीती मिळाली की, कलामंदीर येथील अॅक्सीस बँकेचे पाठीमागे मिलगेट रोडवर संतोश अहीर व गोकुळ अहीर यांचे घरात बंदीस्त जागेमध्ये मटका व लॉटरी सारखा जुगार खेळत व खेळवित असल्याचे माहीती प्राप्त झाली.
प्राप्त माहीतीच्या आधारे राजेश नारायण डाकेवाड, वाचक पोलीस उप निरीक्षक सोबत, पोहेकों सुदाम जाकोरे, पोना। गजानन कदम, भगवान झंपलवाड, पोकों अंकुश लांडगे, गणेश श्रीरामे, महिला पोलीस अंमलदार अर्चना भोकर, चालक पोकॉ/ लक्ष्मण डोपेवाड यांनी पंचासह संतोश अहीर व गोकुळ अहीर यांचे बंदीस्त खोलीमध्ये छापा मारला असता सदर ठीकाणी जुगार खेळणारे व खेळविणारे एकुण 24 जुगारी मिळुन आले. त्यानंतर जुगार अडया वरील घरामध्ये आरोपी नाने गोकुळ बाबुलाल आहीर वय 58 वर्षे व्यवसाय बेकार रा. कलामंदीर शिवशक्तीनगर नांदेड यांचे घराची झडती घेतली असता त्यांचे कडे 3 तलवारी व 1 खंजर असा एकुण 5000/- रुपये माल जप्त करण्यात आला असून सदर आरोपीतांविरुध्द पोउपनि राजेश डाकेवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड येथे कलम 4/25 कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहोत. सदर कार्यावाही केल्याबाबत वरीष्ठांनी कौतुक केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड