अमित देसाई
ठाणे दि.२८ : जाहिर झालेल्या २०२४ विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आता सुरु झाली आहे , याच पार्श्वभूमीवर जिजाऊ संघटनेचे अनेक उमेदवार कोकणातील वेगवेगळ्या भागातून अर्ज भरत आहेत. दिनांक २८ ऑक्टोंबर रोजी ठाणे विधानसभा मतदारसंघातून आरती ताई भोसले आणि कळवा – मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून ज्योत्स्ना ताई हांडे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.
यावेळी जिजाऊ संघटनेच्या मोनिकाताई सांबरे उपस्थित होत्या. तसेच उमेदवारी अर्ज भरण्याआधी ठाणे शहरामध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये जिजाऊ संघटनेमधील अनेक महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था हि कोकणातील शिक्षण , आरोग्य , महिला सक्षमीकरण , रोजगार आणि शेती या पाच मुल तत्वांवर काम करते आणि जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे हे गरजू व्यक्तींना नेहमीच मदत करतात . २०२४ लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश सांबरे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, त्यावेळी जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांना तब्बल अडीच लाख मतदान केल.
त्याच विश्वासाची आता गरज आहे,कोकणाच्या सार्वांगीण विकासाच्या हेतुने जिजाऊ संघटना कोकणातील वेगवेगळ्या मतदारसंघातून आपले उमेदवार उभे करत आहे . जनता समाजासाठी जिजाऊने केलेले काम लक्षात ठेवुन आम्ही उभ्या केलेल्या उमेदरावाला नक्की मतदान करेल असा विश्वास जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी व्यक्त केला .
#सत्यप्रभा न्यूज # ठाणे