छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी विजय पाटील दि २३: लग्न झाले, नवा संसार सुरू झाला, काही दिवस सर्व काही सुरळीत सुरू होते… पण एकेदिवशी रात्री ती दचकून झोपेतून उठली अन् पतीने तिच्यावर फिट येत असल्याचा आरोप लावून नांदवायला नकार दिला. पुढे तिचा छळ वाढत गेला, माहेरावरून 2 लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत तिला घराबाहेर काढण्यात आले. मुकुंदवाडीतील संजयनगरातील 22 वर्षीय विवाहितेने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या 5 जणांविरुद्ध तक्रार दिल्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वर्षा राहुल राठोड (वय 22, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) या विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा पती राहुलसह सासू, सासरे, दीर अशा 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, 2 जून 2024 ला वर्षाचे लग्न झाले होते. 8 जून 2024 रोजी झोपेत दचकून उठली म्हणून पतीने तुला फिट येतात, मला तू लागत नाही, असे म्हणून नांदविण्यास नकार दिला. त्यानंतर कामावरून टोमणे मारून मानसिक त्रास दिला. घराचे अर्धवट राहिलेले बांधकाम पूर्ण करण्यासाठी 2 लाख रुपये माहेरावरून आणण्याची मागणी केली. 20 जून 2024 रोजी तिला घरातून बाहेर काढले, असे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. तपास पोलीस अंमलदार इम्तियाज अली खान करत आहेत.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर